Mallikarjun Reddy : देवेंद्र फडणवीसांसमोरच शिंदेंच्या आमदारावर टीकास्त्र, काय घडलं?

योगेश पांडे

या कार्यकर्ता मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांनी आपली खदखद व्यक्त केली.

ADVERTISEMENT

bjp Former MLA Mallikarjun Reddy attacks on independent MLA Ashish Jaiswal in front of devendra fadnavis.
bjp Former MLA Mallikarjun Reddy attacks on independent MLA Ashish Jaiswal in front of devendra fadnavis.
social share
google news

Maharashtra Political News in Marathi : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना युतीचे सरकार येऊन वर्षही होत नाही, तोच दोन्ही पक्षातील अंतर्गत कलह समोर येण्यास सुरूवात झाली आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात भाजप कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी आक्रमक होताना दिसत आहे. दुसरीकडे आता भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांवर टीकेची तोफ डागली आहे. कार्यकर्ता मेळाव्यात नेमकं काय घडलं? माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी काय म्हणाले? तेच समजून घेऊयात…

11 जून रोजी भाजपचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यकर्ता मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांनी आपली खदखद व्यक्त केली. रेड्डी यांनी रामटेकचे आमदार आशिष जैस्वाल यांच्या भाजप-शिवसेना युतीत असण्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

आशिष जैस्वाल यांच्याबद्दल मल्लिकार्जून रेड्डी काय म्हणाले?

कार्यक्रमात बोलताना रेड्डी म्हणाले, “मी कार्यकर्त्यांसाठी काम करतो. मी तिन्ही नगर परिषद निवडून आणल्या. ग्राम पंचायती निवडून आणल्या. खरेदी-विक्री संघ निवडून आणला. यांचा दावा काय? यांचा काही वाटा आहे काय? मीडियाला विनंती करतो की, मी जे बोललो ते दाखवू नका. मी काही युतीला विरोध करत नाही, माझे समर्थन आहे. फक्त व्यक्तिगत त्यांनी (कमळला पाडून आले) आणि आता आमच्या मांडीला मांडी लावून बसत असतील, मला मान्य नाही.”

मल्लिकार्जून रेड्डी अस्वस्थ का आहेत?

2014 मध्ये भाजप-शिवसेना युती नसताना मल्लिकार्जून रेड्डी यांनी आशिष जैस्वाल यांना रामटेक विधानसभा मतदारसंघातून पराभूत केले होते. पण, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र आले आणि लढले. त्यावेळी हा मतदारसंघ भाजपला सुटला आणि मल्लिकार्जून रेड्डी हे भाजपचे उमेदवार होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp