Maharashtra Rain : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट, फडणवीस, पवारांचं नागरीकांना मोठं आवाहन
Maharashtra Rain Update : पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी देखील नागरीकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा
सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा
लष्कर आणि एनडीआरएफ यंत्रणांना अलर्ट मोडवर
Maharashtra Rain Update : महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. या इशाऱ्यासोबत धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्गही करण्यात येणार आहे. त्यामुळे पुरस्थितीची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी देखील नागरीकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. (maharashtra rain 2024 pune and satara red alert ajit pawar devendra fadnavis big appeal to citizens)
अजिच पवारांचं ट्विट जसंच्या तसं....
पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात येत आहे.
खडकवासला धरणातून सध्या 27 हजार 16 क्युसेक्स, मुळशीतून 27 हजार 609 क्युसेक्स, पवनातून 5 हजार क्युसेक्स, चासकमान धरणातून 8 हजार 50 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरु आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Harshvardhan Patil : ''महायुतीत मला टार्गेट केलं जातंय'', हर्षवर्धन पाटलांचा नेमका रोख कुणावर?
धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरु राहिल्यास विसर्गाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्यानेही पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ दिला आहे. यासंदर्भात मी पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी-चिचवडचे महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा केली असून त्यांना नागरिकांच्या जीवन आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व उपाययोजना, कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. आवश्यकता भासल्यास एनडीआरएफ ची मदत घेण्यासाठी त्यांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. त्यासाठी स्थानिक प्रशासनाने नागरिकांना संपूर्ण मदत, सहकार्य करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरात भारतीय हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. खडकवासला भागात सध्या मुसळधार पाऊस होत असल्याने सध्या 27,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
ADVERTISEMENT
पाऊस आणखी वाढला तर यापेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ती शक्यता गृहित धरुन स्वत: सिंचन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी पुणे विभागीय आयुक्तांना संपूर्ण स्थितीची माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Paris Olympic 2024 : 46 सेकंदात प्रतिस्पर्ध्यांला गारं केलं, नंतर महिला बॉक्सरवर पुरूष असल्याचा आरोप; नेमका वाद काय?
सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी सुद्धा सिंचन विभाग संपर्कात असून, जिल्हाधिकाऱ्यांना लष्कर आणि एनडीआरएफ इत्यादी यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. सर्वच विभाग समन्वयाने स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. तथापि नागरिकांनी सुद्धा सतर्क राहून काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT