'भाताच्या पातेल्यात लघुशंका केली..' आळंदी सामूहिक अत्याचार प्रकरणातील पीडितेचा गंभीर आरोप
श्याम महाराज राठोड यांच्यासह काही जणांविरोधात सामूहिक अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. यामध्ये पीडितेने अनेक गंभीर आरोप केले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भाताच्या पातेल्यात लघुशंका केली..
आळंदी सामूहिक अत्याचार प्रकरणातील पीडितेचा गंभीर आरोप
Alandi Gangrape Case : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते विकास लवांडे यांनी वीस महाराजांना घुसखोर म्हटल्याने राज्यात वाद निर्माण झाला होता. या वीस जणांपैकी एका महाराजांवर पिंपरी-चिंचवडच्या दिघी पोलीस ठाण्यात सामूहिक लैंगिक अत्याचाराचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. श्याम महाराज राठोड असं गुन्हा दाखल झालेल्या महाराजांचं नाव आहे. त्यांच्यासोबत इतर काहीजणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने 24 एप्रिल रोजी फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीत अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यापैकी एक आरोप म्हणजे भाताच्या पातेल्यात करण्यात आलेल्या लघुशंकेचा.
फिर्यादीत केले गंभीर आरोप
पीडित महिलेने 24 एप्रिल रोजी पिंपरी-चिंचवडच्या दिघी पोलीस ठाण्यात श्याम महाराज राठोड यांच्यासह अभिमन्यू आंधळे, नारायण खंदारे, राहुल सुरेश चोरडीया, कानीफनाथ घुले, युवराज खरमाटे आणि एका महिलेविरोधात फिर्याद दाखल केली. यांच्याविरोधात सामूहिक लैंगिक अत्याचार, धमकी आणि जबरदस्ती केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. या फिर्यादीत पीडितेने अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यानुसार, 7 एप्रिल रोजी आरोपींनी महिलेच्या घरात घुसून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले आणि तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत अत्याचार केला. तसेच घर त्यांच्या नावावर करण्यासाठी दबाव टाकत, 'घर विकून पैसे द्या, अन्यथा सतत त्रास देऊ,' अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.
हे ही वाचा : आळंदी : महिलेच्या घरात घुसून सामुहिक अत्याचार, श्याम महाराजावर गंभीर आरोप
भाताच्या पातेल्यात लघुशंका
दिघी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत आणखी काही धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. चार ते पाच महिन्यांपूर्वीदेखील आरोपींनी पीडितेच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच पीडितेने बनवलेल्या भाताच्या पातेल्यात आरोपींपैकी एकाने लघुशंका केल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.
हे ही वाचा : जालना : चेहरा, छाती, गळा काहीच सोडलं नाही, प्रेमात पडल्याने 18 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
'महिलांच्या अब्रुवर हात टाकणारे..'
आरोपी एवढे करुन थांबले नाहीत. या घटनेनंतर ते पुन्हा पीडितेच्या घरी गेले. मात्र त्यावेळी पीडितेने घराचा दरवाजा उघडला नाही. तेव्हा आरोपींनी शिवीगाळ करत सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी दिली. सध्या या प्रकरणाचा दिघी पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, या प्रकरणावर आमदार रोहिच पवार यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत सत्ताधाऱ्यांना सवाल केला आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं की, 'महिलांच्या अब्रुवर हात टाकणारे वारकरी असू शकत नाहीत. अशा गुंडांना संरक्षण द्यायचं की त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणायचा, हे सत्ताधाऱ्यांनी ठरवावं.'









