कोकणात उष्ण व दमट हवामान! मराठवाडा आणि विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये कोसळणार पावसाच्या हलक्या सरी

मुंबई तक

महाराष्ट्र आजचा हवामान: एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामानाची स्थिती बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे.

ADVERTISEMENT

हवामानाचा अंदाज (फोटो सौजन्य: Grok)
हवामानाचा अंदाज (फोटो सौजन्य: Grok)
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात कोणत्या जिल्ह्यात पसरणार उष्णतेच्या लाटा?

point

कोणत्या भागात पडणार पाऊस?

point

आजच्या हवामानाबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Maharashtra Weather Today : एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामानाची स्थिती बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल मंगळवारी 15 एप्रिल 2025 ला राज्यातील अनेक ठिकाणी 30-40 अंश सेल्सियस तापमानाची शक्यता वर्तवण्यात आली होती. कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्ण व दमट, विदर्भातही उकाडा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून बांधण्यात आला होता. तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. अशातच आज 16 एप्रिलला बुधवारी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान कसं असणार आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील  जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा >> 5 मुलांच्या आईचं 25 वर्षीय तरुणासोबत जडलं प्रेम! प्रेमकहाणीचा झाला सर्वात धक्कादायक शेवट, काय घडलं?

तर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, सातारा, सातारा घाट परिसर, जालना, परभणी, बीड, हिंगोलीमध्ये कोरडं हवामान असण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. 

दरम्यान, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट परिसर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळणार असण्याची शक्यता आहे. तर अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळमध्ये विजांचा गडगडाट, वादळी वाऱ्यासह (30-40 किमी प्रति तास वेगाने) पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

हे वाचलं का?