Maharashtra Weather: रत्नागिरी, सिंधुदुर्गात अतिमुसळधार तर घाट माथ्यावरही तुफान पावसाचा अंदाज, पाहा आजचा अंदाज

मुंबई तक

Maharashtra Weather Update: कोल्हापूर, सातारा, रायगड, आणि रत्नागिरीसारख्या भागात पूरजन्य परिस्थितीमुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी.

ADVERTISEMENT

Maharashtra Weather 21 june 2025 imd (फोटो सौजन्य: Grok)
Maharashtra Weather 21 june 2025 imd (फोटो सौजन्य: Grok)
google news

मुंबई: महाराष्ट्रात यंदा मान्सून तब्बल 12 दिवस लवकर दाखल झाला असून मागील आठवड्यापासूनच पावसाने जोर धरला आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, आज (21 जून) रोजी राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

1. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र:

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग: या भागांमध्ये 21 जून रोजी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे, तर रायगड आणि रत्नागिरीसारख्या किनारी भागांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. समुद्राला मोठी भरती असण्याची शक्यता आहे, त्यामुळे किनारपट्टीवरील भागात सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली: पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे आणि कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, जिथे वादळी वाऱ्यासह (४०-५० किमी/तास) आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडेल. सातारा आणि सांगलीत देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे.

2. मराठवाडा:

लातूर, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे, परंतु दक्षिण मराठवाड्यात (लातूर, धाराशिव) पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहील. यलो अलर्ट जारी आहे.

हे वाचलं का?