महाराष्ट्रातील आजचे हवामान, 25 Apr 2025: थोडं सांभाळा, दुपारी पडू नका बाहेर.. नागपूर, चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यात Heat Wave
महाराष्ट्रातील आजचे हवामान: एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून तापमान अधिक वाढत असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हिट वेव्हचा अलर्ट देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्रात सध्या उन्हाचा तडाखा आणि अवकाळी पावसाचे संमिश्र हवामान अनुभवले जात आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, 25 एप्रिल 2025 रोजी राज्यात हवामानाची परिस्थिती नेमकी कशी असेल ते जाणून घेऊया.
1. तापमान आणि उष्णतेची लाट
विदर्भ आणि मराठवाडा: या भागात उष्णतेची लाट (Heatwave) कायम राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 42 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. अकोला, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा यासारख्या जिल्ह्यांमध्ये तापमान 45 अंशांपेक्षा जास्त नोंदवले जाऊ शकते.
मध्य महाराष्ट्र आणि कोकण: पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि मुंबईसह कोकणातील काही भागात उष्ण आणि दमट हवामान राहील. कमाल तापमान 35 ते 40 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 ते 28 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असेल.
उच्च आर्द्रता: कोकण आणि मुंबईत आर्द्रता 60-70% पर्यंत राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे उकाडा जाणवेल.
हे ही वाचा>> कामाची बातमी: तुमची Important कागदपत्रं एका क्लिकवर; कुठेही मिळवा ऑनलाईन!
2. अवकाळी पाऊस आणि वादळी वारे
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा: पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद आणि जालना यासारख्या भागात दुपारनंतर ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे (30-40 किमी/तास) वाहण्याचा अंदाज आहे.