Maharshtra Weather: कोकणात पावसाची शक्यता, 'या' ठिकाणी येलो अलर्ट जारी, जाणून घ्या वातावरण
Maharashtra Weather Today: राज्यातील हवामान विभागाने 7 ऑगस्ट रोजी राज्यात मिश्र हवामानाचा बदल दिसून येण्याची शक्यता वर्तवली आहे.

बातम्या हायलाइट

राज्यातील हवामान विभागाचा अंदाज

7 ऑगस्ट रोजी कसं असेल राज्यातील हवामान

विदर्भातील हवामानाचा आढावा
Maharashtra Weather : राज्यातील हवामान विभागाने 7 ऑगस्ट रोजी राज्यात मिश्र हवामानाचा बदल दिसून येण्याची शक्यता वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला असला तरी, राज्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील हवामानाचा आढावा खालीलप्रमाणे नमूद केला आहे.
हे ही वाचा : पत्नीच्या पोटात वाढत होतं बाळ, पतीने खोलीत नेलं अन् गळा चिरला, मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात नंतर...
कोकण :
कोकण किनारपट्टीवरील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये 7 ऑगस्ट रोजी हवामान विभागाने ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवली. हवामान खात्याने कोणताही विशेष इशारा (अलर्ट) जारी केलेला नाही, परंतु आर्द्रता जास्त असल्याने उकाडा जाणवू शकतो. मुंबई आणि ठाण्यात कमाल तापमान 30-32°C आणि किमान तापमान 25-26°C दरम्यान राहण्याची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी मध्यम पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान, हवामान विभागाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
मध्य महाराष्ट्र :
पुणे, नाशिक, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. पुण्यात कमाल तापमान 29-31°C आणि किमान तापमान 22-24°C राहील. हवामान खात्याने मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाल्याचे नमूद केले आहे, परंतु पुढील 2-3 दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. नाशिक आणि साताऱ्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, पुणे, सांगली आणि कोल्हापूर येथे पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
मराठवाडा :
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. तर नांदेडृ, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात तापमान 30-33°C आणि किमान तापमान 23-25°सेल्सिअस तापमान राहण्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, जालना, बीड, हिंगोली, लातूर, धाराशिव येथे मान्सूनचा येलो अलर्ट जारी केला.
हे ही वाचा : मेहुणी आणि पत्नी फोनवर सतत बोलायच्या, पतीला वाटलं दोघीही लेस्बियन, नंतर फॅनला लटकलेला आढळला मृतदेह...
विदर्भ :
विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदियात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील हवामान खात्याने विदर्भासाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पावसाची कमी शक्यता आहे. तापमानाचा विचार केल्यास किमान तापमान 24-26° सेल्सिअस तर कमाल तापमान हे 32-34 सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.