Maharashtra weather updates : मुंबई-पुणेकरांनो, काळजी घ्या! 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूरसह महाराष्ट्रात हवामान कसे असेल?
हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रात हवामान कसे असेल?

point

हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यांना दिला इशारा?

point

मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक जिल्ह्याला अलर्ट

Mumbai-Pune, Maharashtra weather Alert : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. शनिवारपासून (3 ऑगस्ट) राज्यात पावसाचा जोर वाढला असून, पुढील काही तासांत काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला असून, पुण्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. (The Indian Meteorological Department has issued an orange alert for Mumbai and a red alert for Pune. Many districts of Maharashtra have been warned of heavy to very heavy rain by IMD.)

ADVERTISEMENT

राज्याच्या पश्चिम घाट भागात आणि कोकणात पुन्हा एकदा पावसाचे धुमशान सुरू झाले आहे. 3 ऑगस्टपासून पावसाचा जोर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात वाढला असून, पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

महाराष्ट्र हवामान अंदाज, 4 ऑगस्ट 2024 : आयएमडीचा इशारा काय?

मुंबई, नाशिकसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पावसाचा जोर जास्त वाढणार आहे. पुढील काही तासांत या भागात अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने पुणे, सातारा आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याचा इशारा दिला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा >> अंतरावली सराटीत मनोज जरांगे पाटील का रडले? 

महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट

पुणे, पालघर, सातारा या तीन जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असून, या जिल्ह्यांतील प्रशासनही अलर्ट झाले आहे.

हेही वाचा >> 'त्या' अमेरिकन महिलेबाबत खळबळजनक माहिती समोर, पोलिसांनाही फुटला घाम 

कोल्हापूर, नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड,परभणी, नांदेड, हिंगोली, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि  गोंदिया या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

ADVERTISEMENT

मुंबईत अतिमुसळधार पावसाचा अंदाज

रविवार, 4 ऑगस्ट रोजी मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. मुंबईकरांना सूर्यदर्शन दुर्मिळ झाले असून, पुढील 24 तास महत्त्वाचे असणार आहे. हवामान विभागाने मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे. 

ADVERTISEMENT

Weather Forecast for Mumbai, Pune and Maharashtra.
मुंबई, ठाणे, नाशिक या जिल्ह्यांना ऑरेज अलर्ट, तर पालघर, पुणे, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

कोकणाला ऑरेंज अलर्ट

ठाणे जिल्हा आणि कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतही अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, प्रशासनाकडून दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT