Maharashtra Weather : छत्र्या काढा रे, राज्यात पाऊस घालणार धिंगाणा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट
Maharashtra Weather : राज्यातील काही जिल्ह्यांत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे, तर काही ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट वर्तवला आहे. जाणून घ्या 25 जून 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात सध्या मान्सूनने दमदार हजेरी लावली
जाणून घ्या 25 जून 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज
Maharashtra Weather : राज्यात सध्या मान्सूनने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता मिटलेली आहे. चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसह मुंबई-पुणेकरांसह अवघ्या देशाला मोठा दिलासा मिळाला आहे. अशातच राज्यातील काही जिल्ह्यांत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे, तर काही ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट वर्तवला आहे. जाणून घ्या 25 जून 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज.
हे ही वाचा : मुंबई: महिलेचा लग्नास नकार, होणाऱ्या सुनेनं सासूचे मॉर्फ फोटो व्हायरल केले अन्..
कोकण
कोकण विभागातील पालघर जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. ठाणे, मुंबईमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. या दोन शहरांना पावसाचा यलो अलर्ट वर्तवला आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी मुसळधार पावसासह वादळाची शक्यता आहे. तसेच सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून यलो अलर्टचा अंदाज आहे.
उत्तम महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. अहिल्यानगर जिल्ह्यांत देखील पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आला. कोल्हापूरमध्ये देखील हिच स्थिती असून यलो अलर्टचा अंदाज आहे.









