Maharashtra Weather : पुढील काही तास महत्त्वाचे, 'या' विभागात उन्हाच्या झळा, IMD चा अलर्ट
Maharashtra Weather : राज्यात 2 मार्च रोजी हवामान हे उष्ण आणि कोरडं हवामान राहील असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. याच महिन्यात कमाल तापमान हे सामान्य ते किंचित कमी राहण्याची शक्यता आहे. तसेच पुढील काही दिवसांत तापमानात वाढ होईल असा अंदाज आहे. तसेच कोकण विभाग, मराठवाडा आणि विदर्भात तीव्र उन्हाचा चटका जाणवेल.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
2 मार्च रोजी कसं असेल हवामान?
हवामान विभागाचा महत्त्वाचा अलर्ट
Maharashtra Weather : राज्यात 2 मार्च रोजी हवामान हे उष्ण आणि कोरडं राहील असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. याच महिन्यात कमाल तापमान हे सामान्य ते किंचित कमी राहण्याची शक्यता आहे. तसेच पुढील काही दिवसांत तापमानात वाढ होईल असा अंदाज आहे. तसेच कोकण विभाग, मराठवाडा आणि विदर्भात उन्हाचा तीव्र चटका जाणवेल.
हे ही वाचा : 41 वर्षीय मालकीणीवर लैंगिक अत्याचार, 'त्या' एका कारणाने तरुण घ्यायचा गैरफायदा, अखेर रंगेहाथ पकडले
कोकण :
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात दमट आणि उष्ण हवामानाचा अंदाज राहील. या विभागात आर्द्रतेचं प्रमाण अधिक असल्याने उकाडा जाणवेल आणि समुद्रकिनाऱ्यावर मध्यम वारे वाहण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये हवामान कोरडं आणि उष्ण राहणार आहे. तसेच याच विभागातील महत्त्वाच्या पुणे शहरातील तापमान उष्ण राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडा :
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिवमध्ये उष्ण आणि कोरडं हवामान राहील. याच विभागातील कापमान हे 33 अंशापर्यंत राहील असा अंदाज आहे.










