Maharashtra Weather : हवामानात मोठा बदल, सूर्यदेव आग ओकणार, 'हे' जिल्हे होरपळून निघणार

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यात दुहेरी संकटानंतर आता एप्रिल महिन्याअखेरीस हवामानात मोठा बदल झाला आहे. अवकाळी पावसाचा धोका कमी झाल्यानंतर सूर्यदेव आग ओकणार आहे. याचा आता नागरिकांना मोठा सामना करावा लागणार आहे.

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
google news

बातम्या हायलाइट

point

एप्रिल महिन्याअखेरीस हवामानात मोठा बदल

point

सूर्यदेव आग ओकणार

Maharashtra Weather : राज्यात दुहेरी संकटानंतर आता एप्रिल महिन्याअखेरीस हवामानात मोठा बदल झाला आहे. अवकाळी पावसाचा धोका कमी झाल्यानंतर सूर्यदेव आग ओकणार आहे. याचा आता नागरिकांना मोठा सामना करावा लागणार आहे. काही ठिकाणी उष्माघाताचं सावट आहे. अशातच 27 एप्रिल 2026 रोजी हवामान विभागाने उन्हाचा अलर्ट जारी केला आहे. 

हे ही वाचा : 'मिसिंग लिंक'चा मुहूर्त ठरला, टोलच्या दरवाढीबाबत महत्त्वाची माहिती, एकनाथ शिंदेंनी केली पाहणी

कोकण 

कोकण विभागात हवामान उष्ण आणि दमट असेल अशी शक्यता आहे. तसेच अवकाळी पावसाचं संकट टळलं आहे, मात्र उन्हामुळे अंगाची लाही लाही होण्याचा अंदाज वर्तवण्यात येतो. मुंबईसह कोकण भागात नागरिकांना उष्णतेचा चांगलाच सामना करण्याची अधिक संभावना आहे. 

मध्य महाराष्ट्र 

मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे सावट होते, मात्र बदलत्या हवामानाने हवामान कोरडं आणि स्वच्छ राहील असा हवामानाचा अंदाज जारी केला. अशातच तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होईल उकाडा अधिक जाणवणार आहे, अशा स्थितीत दुपारी नागरिकांनी बाहेर पडताना उन्हापासून आपली काळजी घ्यावी. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागात सूर्य आग ओकणार आहे, यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होणार आहे. तसेच हवामान कोरडे राहणार असून तापमानाचा पारा अधिक चढण्याची शक्यता आहे. सोमपारपासून पावसाची शक्यता नसून उष्णता अधिक राहणार आहे. 

हे वाचलं का?