Maharashtra Weather : राज्यात दुहेरी संकट, पहिल्यांदाच भयंकर घडतंय; 13 जिल्ह्यांचं काही खरं नाही बाबा...
maharashtra weather : राज्यात हवामानात येत्या काही दिवसांमध्ये मोठा बदल दिसू लागला आहे. अशातच उष्णतेचा प्रभाव आणखी वाढू लागला आहे. अशातच राज्यात एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे पावसाचं सावट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
हवामानात येत्या काही दिवसांमध्ये मोठा बदल दिसू लागला
हवामान विभागाकडून 5 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी
Mharashtra Weather : राज्यात हवामानात येत्या काही दिवसांमध्ये मोठा बदल दिसू लागला आहे. अशातच उष्णतेचा प्रभाव आणखी वाढू लागला आहे. अशातच राज्यात एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे पावसाचं सावट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. या दुहेरी संकटामुळे हवामान विभागाने 5 जिल्ह्यांना पावसाचा , तर 8 जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला. जाणून घेऊयात एकूण हवामानाचा अंदाज.
हे ही वाचा : 'आमच्यात कुठलेही विषय लपवण्याची आवश्यकता नाही..' उद्धव ठाकरेंच्या भेटीबद्दल फडणवीस काय म्हणाले?
कोकण
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. या भागात उकाडा आणि आर्द्रता वाढण्याची अधिक शक्यता आहे. तसेच दुपारी अधिक वेळ बाहेर पडू नये, तसेच बाहेर जरी पडलात तरी उन्हापासून काळजी घ्यावी, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये हवामान ढगाळ राहण्याची अधिक शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी अधिक कोसळू शकतात. यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होईल, मात्र दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडा
मराठवाडा या विभागातील धाराशिव आणि लातूर या दोन जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच या विभागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता जारी करण्यात आली आहे. अवकाळी पावसाचा शेतपिकांवर परिणाम होण्याची अधिक शक्यता आहे.









