Manohar Joshi : BMC क्लार्क ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री... असा होता मनोहर जोशींचा संघर्षमय प्रवास
Manohar Joshi life story in marathi : रायगड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात जन्मलेले मनोहर जोशी कसे झाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

शिवसेना नेते मनोहर जोशी यांचा प्रवास

मनोहर जोशी यांचे शिक्षण

बाळासाहेब ठाकरे आणि मनोहर जोशी
Manohar Joshi Life Story in Marathi : बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं 23 फेब्रुवारी रोजी निधन झालं. राज्यात आणि केंद्रात अनेक पदे भूषवणाऱ्या शिवसेनेच्या जोशी सरांचं आयुष्य संघर्षमय राहिले. रायगड जिल्ह्यातील छोट्याशा गावात जन्मलेले मनोहर जोशी यांचा मुख्यमंत्री आणि लोकसभा अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास कसा होता, हेच बघुयात... (Manohar Joshi Political Journey Biography in Marathi)
मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावात झाला होता. घरची आर्थिक परिस्थिती खूप वाईट. त्यामुळे त्यांचं आयुष्याचा प्रवास खडतर राहिला. वडील भिक्षुकी मागायचे. मनोहर जोशी यांनीही भिक्षुकीतून मागून कुटुंबाला हातभार लावला.
मनोहर जोशी यांचं शिक्षण
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचं चौथीपर्यंतच शिक्षण नांदवीला झालं. पाचवीचं शिक्षण महाड, तर सहावीनंतर ते मामाकडे पनवेलला आले. मामाची बदली झाल्यानंतर ते गोल्फ मैदानात बॉयची नोकरी करू लागले. या काळात ते मित्राच्या खोलीत राहत होते. त्यांच्या जेवणाची व्यवस्था महाजन बाईंकडे होती.
पुढे मनोहर जोशी ११ वीच्या शिक्षणासाठी मुंबईतील बहिणीकडे आले. सहस्त्रबुद्धे क्लासमध्ये त्यांनी शिपायाची नोकरी केली आणि शिक्षण घेतले. नंतर किर्ती कॉलेजमधून त्यांनी बीएची पदवी घेतली.