Manoj Jarange : लोकसभा निवडणुकीत 'करेक्ट कार्यक्रम'! जरांगेंचा प्लॅन तयार
Manoj Jarange Patil Meeting in Antarwali sarati : अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची महाबैठक झाली. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीबद्दलची भूमिका स्पष्ट केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अंतरवाली सराटीत झाली महाबैठक

लोकसभा निवडणुकीबद्दल मनोज जरांगेंनी मांडली भूमिका

मराठा समाजाचा लोकसभा निवडणुकीबद्दल निर्णय झाला
Manoj Jarange Patil Lok Sabha elections 2024 : (गौरव साळी, अंतरवाली सराटी) मनोज जरांगे पाटील यांनी यांनी आज अंतरवाली सराटी गावात महाबैठक घेतली. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण समर्थकांसमोर मोठी घोषणा केली. आगामी लोकसभा निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जायचे, याबद्दलचा संपूर्ण प्लॅन मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केला. (Manoj Jarange Patil meeting Latest Update and speech)
मनोज जरांगे म्हणाले, "आपण इथे सरकारची इच्छा पूर्ण करायला आलेलो नाही. आपल्या लेकरांची इच्छा पूर्ण करायला आलो आहोत. आपण गाफील राहावं ही सरकारची भूमिका आहे."
"सगळ्या पक्षातील मराठे स्वतःच्या लेकरांसाठी एकत्र आले आहेत, मग ते सत्ताधारी असो वा विरोधी. सगळ्यांना आशा होती की शिंदे साहेब करू शकतात, पण तुम्ही सुद्धा विधान भवनात आमच्याविरोधात गरळ ओकली आणि करेक्ट कार्यक्रम कार्यक्रम करू म्हणून सांगितलं", असे म्हणत जरांगे पाटलांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.
जरांगे म्हणाले, "काही गरज नसताना तुम्ही मराठ्यांची लाट अंगावर घेतली. मी मराठ्यांना सांगायचो की, आरक्षण देतील, तर शिंदे साहेबच. कुणी मिठाचा खडा टाकला माहिती नाही, शेवटी मीटिंगही होऊ दिली नाही."