IAS: कधीकाळी गोळ्या झाडणाऱ्या ‘या’ माणसाने घडवले शेकडो कलेक्टर…

रोहित गोळे

ADVERTISEMENT

many of students taught by him have become collectors know the story of ojha sir who fired bullets in his time
many of students taught by him have become collectors know the story of ojha sir who fired bullets in his time
social share
google news

Awadh Ojha Sir Story: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा-2022 (IAS) चा निकाल मंगळवारी (23 मे) जाहीर केला आहे. यामध्ये ग्रेटर नोएडा येथील रहिवासी असलेल्या इशिता किशोरने अव्वल स्थान पटकावले आहे. अनेकदा निकाल लागल्यानंतर यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचीच अधिक चर्चा होते. कारण ते तेवढी कठोर मेहनत देखील करतात. पण यादरम्यान त्यांना घडवणारे शिक्षक हे कायम पडद्यामागेच राहतात.. ज्यांनी खरं तर या विद्यार्थ्यांना पैलू पाडलेले असतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा शिक्षकाची गोष्ट सांगणार आहोत, ज्याने हजारो मुलांना यूपीएससी परीक्षेत भरघोस यश मिळवून दिलं आहे. (many of students taught by him have become collectors know the story of ojha sir who fired bullets in his time)

ADVERTISEMENT

आम्ही बोलत आहोत इतिहासाचे शिक्षक अवध ओझा यांच्याबद्दल. अवध ओझा हे मुलांमध्ये ओझा सर (Ojha Sir) म्हणून प्रसिद्ध आहेत. यूपीच्या गोंडा जिल्ह्यातील रहिवासी असलेले ओझा सर सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत असतात. आज आम्‍ही तुम्‍हाला अवध ओझा सरांशी संबंधित एक रंजक गोष्ट सांगणार आहोत… जेव्हा त्यांनी त्यांच्या तारुण्‍यात रागाच्या भरात थेट गोळ्याच झाडल्या होत्या.

इंडिया टुडेच्या डिजिटल चॅनल द लॅलनटॉपला दिलेल्या मुलाखतीत ओझा सरांनी सांगितले होते की, तरुणपणी ते प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचा ‘चरस’ चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. तो चित्रपट पाहण्यासाठी ते ज्या सिनेमागृहात गेले होते ते थिएटर तत्कालीन खासदार सत्यदेव सिंह यांचा असल्याचे त्यांनं समजलं.

हे वाचलं का?

ओझा सर म्हणाले – मी गोळीबार केला होता

ओझा सर म्हणाले, “त्या चित्रपटगृहात एक गृहस्थ होता ज्याने चित्रपटाच्या मध्यंतरात अचानक मला थप्पड मारण्यास सुरुवात केली. तो म्हणाला- ‘असाच तू मोठ्या दिमाखात फिरतोस, तू स्कूटरवर जातोस.’ त्यानंतर तिथेच पहिला शूटआऊट झाला. म्हणजे अर्धा तास गोळीबार सुरू होता. यावेळी मला गोळी लागली नाही, तर मी स्वतःच गोळी झाडली होती.’ ओझा सरांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.

ओझा सर झाले होते फरार

ओझा सर म्हणाले, “मग आम्ही पळून गेलो. कलम 307 लागू करण्यात आलं होतं. महिनाभर मी फरार होतो. माझी आई वकील होती, त्यामुळे त्यांनी एक उत्तम काम केले की त्यांनी एकाच दिवसात कनिष्ठ न्यायालयात आणि सत्र न्यायालयात जामीन मिळाला होता.

मात्र, त्यानंतर आश्रम आणि अभ्यासाकडे त्यांचा कल वाढला आणि त्यानंतर त्यांचे आयुष्य बदलले, असे ओझा सरांनी सांगितले.

ADVERTISEMENT

कोण आहे ओझा सर?

अवध ओझा सर हे UPSC परीक्षेची तयारी करणारे शिक्षक आणि youtuber तसेच एक उत्तम मोटिव्हेशनल शिक्षक आहेत. कोविड-19 मुळे ऑफलाइन क्लासेस बंद असताना 2020 पासून त्यांनी यूट्यूबवर ऑनलाइन क्लासेस सुरू केले होते. त्यांच्या अनोख्या शिकवण्याच्या शैलीमुळे ते यूट्यूबवर पटकन लोकप्रिय झाले होते.

ADVERTISEMENT

खरं तर अवध ओझा यांनी डॉक्टर व्हावे अशी त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती, म्हणून त्यांनी त्यांना वैद्यकीय तयारीसाठी अलाहाबादला पाठवले, परंतु त्यांना वैद्यकीय शिक्षणात रस नव्हता. म्हणूनच त्यांनी ते शिक्षण सोडून दिले. याचवेळी काही मित्रांच्या साथीने त्यांनी UPSC ची तयारी सुरु केली. यावेळी त्यांनी परीक्षेत सर्व टप्पे जवळजवळ पास केले. पण त्यांना IAS बनण्यात यश आलं नाही.

अवध ओझा यांनी आपल्या करिअरची सुरुवात शिक्षक म्हणून केली होती. जे आता IAS ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यांनी दिल्लीतील अनेक आयएएस संस्थांमध्ये शिकवले आहे. चाणक्य आयएएस अकादमी, एबीसी अकादमी ऑफ सिव्हिल, वजीराम रवी यासारख्या नामंकित आयएएस अकादममध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना IAS चे धडे दिले आहेत. ज्यामुळे अनेक विद्यार्थी हे आज IAS झाले आहेत. दरम्यान, अवध ओझा यांनी आपली IQRA IAS अकादमीची स्थापना केली. जिथे ते विद्यार्थ्यांचं करिअर घडवत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT