Maratha Morcha: फडणवीस म्हणतात, ‘मराठा आंदोलकांनी आधी दगडफेक केली, म्हणून पोलिसांनी…’

रोहित गोळे

ADVERTISEMENT

maratha protesters pelted stones first so the police resorted to baton attack devendra fadnavis gave the exact information about the incident in jalna
maratha protesters pelted stones first so the police resorted to baton attack devendra fadnavis gave the exact information about the incident in jalna
social share
google news

Devendra Fadnavis on Maratha Morcha Lathihalla: मुंबई: जालन्यातील (Jalna) अंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांना (Maratha Morcha) पोलिसांकडून झालेल्या अमानुष मारहाणीनंतर राज्यभरातील वातावरण तंग झालं आहे. राज्यात काही ठिकाणी जाळपोळ देखील करण्यात आली आहे. अशावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे याबाबत सविस्तर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मराठा आंदोलकांनी पोलिसांना घेरून आधी दगडफेक केली. म्हणून पोलिसांनी लाठीहल्ला (Lathihalla) केला. मात्र, अनेक आंदोलकांचा आरोप आहे की, पोलिसांनी सुरुवातीला लाठीहल्ला केला. (maratha protesters pelted stones first so the police resorted to baton attack devendra fadnavis gave the exact information about the incident in jalna)

ADVERTISEMENT

दरम्यान, ही घटना नेमकी काय आहे आणि कशी घडली याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना नेमकी माहिती दिली आहे.

जालन्यातील मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीहल्ला, पाहा गृहमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले.

‘जालन्यातील घटना ही दुर्दैवी पण आहे आणि गंभीरपण आहे. पण त्याठिकाणी जे उपोषणकर्ते होते त्यांच्याशी स्वत: मुख्यमंत्री बोलले होते. विविध प्रकारे त्यांच्याशी आमचा संवाद सुरू होता. त्यांनी उपोषण परत घ्यावं.. कारण मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार गंभीरतेने काम करतेय पण हा न्यायालयाशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित विषय आहे. त्यामुळे हा विषय काही एका दिवसात संपणारा नाही. तो सोडविण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न हे चालले आहेत. हे गंभीरपणे प्रयत्न सुरू आहेत.’

हे वाचलं का?

‘अशा प्रकारे त्यांना आम्ही सांगत देखील होतो. मात्र, त्या ठिकाणी ते काही उपोषण सोडायला तयार नव्हते. त्यांची प्रकृती खराब होत होती. त्यामुळे ही राज्याची जबाबदारी आहे की, अशा प्रकारे उपोषण होत असेल आणि तब्येत खराब होत असेल तर त्यांना नेऊन दवाखान्यात दाखल केलं पाहिजे. त्याप्रकारे काल देखील प्रयत्न केला.’

‘पण काल तिथे जमलेल्या लोकांनी सांगितलं की, आज नाही तुम्ही उद्या या.. उद्या त्यांना दाखल करू. पुन्हा प्रशासनाने ती भूमिका घेतली. प्रशासन पुन्हा आज त्या ठिकाणी गेलं आणि त्यांना विनंती केली.’

हे ही वाचा >> Jalna लाठीहल्ला, ‘गृहमंत्र्याच्या मनातील भावना हीच पोलिसांची कृती’ शरद पवारांचा आरोप

‘दुर्दैवाने आज त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलिसांना घेरून मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. जवळपास अधिकाऱ्यांसह 12 पोलीस हे त्या दगडफेकीत जखमी झाले. त्यामुळे त्याठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला.’

‘आपण जर बघितलं असेल तर लाठीचार्जमध्ये कोणी गंभीर जखमी होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामध्ये जर तो लाठीचार्ज.. लाठीचार्ज तर कमी झाला.. काही अश्रूधुराचे नळकांड्या फोडण्यात आल्या. त्या जर नसत्या फोडल्या तर तिथे जे काही पोलिसांचं पथक गेलं होतं ते जो काही बेछूट अशी दगडफेक होत होती त्यात.. ते आता तर जखमी झाले आहेत. पण अतिशय वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागलं असतं.’

ADVERTISEMENT

‘म्हणून मला असं वाटतं की, राज्य सरकार याबाबत पूर्णपणे संवेदनशील आहे. आम्ही याआधी देखील खरं म्हणजे मराठा आंदोलकांशी सातत्याने चर्चा केलीए. मी मुख्यमंत्री असताना तर आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात ते आरक्षण का टिकलं नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यावर मी काही बोलणार नाही.’

‘मात्र आताही मुख्यमंत्र्यांनी स्वत: समिती तयार केली आहे. ती त्या ठिकाणी प्रयत्न करतेय. वेगवेगळ्या ज्या मागण्या आल्या आहेत त्या मागण्यांवर प्रयत्न सुरू आहे. म्हणून मला सगळ्यांना आवाहन करायचं आहे की, मराठा आरक्षणचा प्रश्नावर सरकार गंभीर असल्याने कोणीही कायदा आपल्या हाती घेऊ नये.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Maratha kranti morcha:’आता आम्हाला गोळ्या घाला, आरक्षण हे घेणारच’, सरकारला नेमका इशारा कोणाचा..?

‘विशेषत: अशा प्रकारे जर लोकं त्याठिकाणी एखाद्या व्यक्तीला उपोषणाला बसवून अशाप्रकारे त्याला घेरून ठेवायचं आणि त्याला मरण्यासाठी सोडून द्यायचं.. सरकार बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही. सरकारला त्यांना वाचवावं लागेल. अशाप्रकारे कोणालाही सरकारला मरू देता येणारी. म्हणून पोलिसांनी ती भूमिका घेतली आहे. यात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे पोलिसांच्या लाठीहल्ल्याबाबत त्यांची पाठराखण केल्याचं दिसून आलं आहे.

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT