Kalyan Marathi Family: 'माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय...', फडणवीसांनी एका झटक्यात 'त्या' अधिकाऱ्याला...

मुंबई तक

कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या सरकारी अधिकारी अखिलेश शुक्ला याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ज्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत बोलताना दिली आहे.

ADVERTISEMENT

CM फडणवीसांनी आरोपी अखिलेश शुक्लाला केलं निलंबित
CM फडणवीसांनी आरोपी अखिलेश शुक्लाला केलं निलंबित
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कल्याणमध्ये हायप्रोफाईल सोसायटीमध्ये मारहाण

point

मराठी कुटुंबाला मारहाण करणारा मंत्रालयातील अधिकारी

point

आरोपी अखिलेश शुक्लाला शासकीय नोकरीतून निलंबित

नागपूर: कल्याणमधील हायप्रोफाईल सोसायटीमध्ये मराठी कुटुंबीयांना मारहाण करणाऱ्या शासकीय अधिकारी अखिलेश शुक्ला याच्यावर आता स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी कारवाई केली आहे. कल्याणमधील मराठी कुटुंबाला हिणवत त्यांना बेदम मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्ला या मंत्रालयातील अधिकाऱ्याला थेट निलंबित करण्यात आलं आहे. (marathi family brutally beaten up in high profile society in kalyan video goes viral chief minister devendra fadnavis suspended accused akhilesh shukla)

अखिलेश शुक्ला याने केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण अधिकच तापलं. त्यामुळे थेट सभागृहात यावर सरकारला प्रश्न विचारण्यात आले. त्यामुळे प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी आरोपी असलेल्या अखिलेश शुक्ला याचं निलंबन केल्याची घोषणा विधान परिषदेत बोलताना केली आहे. 

कल्याण मारहाण प्रकरण: CM फडणवीसांनी विधान परिषदेत केली मोठी घोषणा

कल्याण मारहाण प्रकरणी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 'अखिलेश शुक्ला आणि त्याच्या पत्नीने या ठिकाणी भांडण झालं आणि त्याठिकाणी मराठी माणसाला अपमानित होईल अशा प्रकारचे उद्गार काढले, भांडण केलं, मारामारी केली.. त्यातून एक संतापाची लाट सर्व लोकांमध्ये तयार झालीए. पहिल्यांदा तर मी सांगू इच्छितो की, हा अखिलेश शुक्ला हा MTDC चा कर्मचारी आहे. त्याच्यावर एफआयआर नोंद झाला आहे. पत्नीवर देखील एफआयआर नोंद झाला आहे. दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.' 

हे ही वाचा>> शरद पवार आणि PM मोदींच्या भेटीनंतर होणार सगळ्यात मोठा राजकीय धमाका? | Opinion

'अखिलेश शुक्ला याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई इथे करण्यात येत आहे. पुढील कारवाई पोलीस करतील. मुळात कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही. मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता आणि मराठी माणसाचाच आहे आणि राहील.' 

हे वाचलं का?

    follow whatsapp