Goregaon Fire Accident: गोरेगावमध्ये अग्नितांडव! गोडाऊनला लागली भीषण आग, फिल्म शूटिंग...

मुंबई तक

Goregaon Warehouse Fire Accident : मुंबईच्या गोरेगाव येथे फर्निचर मार्केटला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडलीय. ही आग सकाळी 11 वाजता लागल्याचं समजते. गोडाऊनला अचानक आग लागल्याने फिल्म शुटिंगचं सामान जळून खाक झालं आहे.

ADVERTISEMENT

Goregaon Fire Accident Update
Goregaon Fire Accident Update
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई गोरेगावच्या गोडाऊनमध्ये भीषण आग

point

गोडाऊनमध्ये आग लागल्याने फिल्म शूटिंगचं सामान जळून खाक

point

आगीच्या घटनेत जीवितहानी नाही

Goregaon Warehouse Fire Accident : मुंबईच्या गोरेगाव येथे फर्निचर मार्केटला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडलीय. ही आग सकाळी 11 वाजता लागल्याचं समजते. गोडाऊनला अचानक आग लागल्याने फिल्म शुटिंगचं सामान जळून खाक झालं आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीच्या या दुर्देवी घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याचं कळते आहे. 

गोडाऊनला आग लागल्याने आसपासच्या परिसरात धुराचे लोळ पसरत आहेत. त्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना सतर्क करण्यात आलं आहे. आगीच्या ठिकाणापासून लोकांनी दूर राहावं, अशा सूचनाही अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, गोडाऊनला लागलेली आग पाच फर्निचरच्या दुकानांपर्यंत पसरल्याची माहिती आहे. एका अधिकाऱ्याने माहिती दिली की, आगीची घटना सकाळी 11.19 वाजता घडली आणि रहेजा बिल्डिंगच्या खडकपाडा मार्केटमध्ये असलेल्या पाच फर्निचरच्या दुकानापर्यंत ही आग पसरली. या आगीच्या घटनेला तिसऱ्या स्तरावर ठेवण्यात आल्याचंही अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

हे ही वाचा >> Pune: दोन तरुणींचा हृदय पिळवटून टाकणारा मृत्यू CCTV मध्ये कैद, सिमेंट मिक्सर ट्रकच...

फिल्म शूटिंगचा सामान आगीत जळून खाक

मिळालेल्या माहितीनुसार, या आगीच्या घटनेत फिल्म शूटिंगचा सामान जळून खाक झाला आहे. फर्निचर मार्केटमध्ये असलेल्या लाकडाच्या गोडाऊनलाही आग लागल्याने वित्तहानी झाली आहे. या आगीच्या घटनेबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आणि आग विझवण्याचं काम सुरु आहे. आग कशामुळे लागली, याची चौकशी झाली पाहिजे. कारण अनेकदा आग लागल्याच्या घटना घडत असतात.

हे ही वाचा >> 'CM फडणवीसांच्या मनात मराठ्यांविषयी राग, द्वेष असेल तर...', उपोषण सुरू होताच जरांगे काय म्हणाले?

हे वाचलं का?

    follow whatsapp