Microsoft Cloud Outage: वाट लागली... Microsoft चे सर्व्हर ठप्प, बँका ते फ्लाइट सारंच विस्कळीत
Microsoft Outage: जगभरातील विंडोजवर काम करणाऱ्या प्रणालींना समस्या येत आहेत. CrowdStrike च्या सेवांवर परिणाम होत असल्यामुळे लोकांच्या सिस्टीम बंद पडत आहेत यामुळे प्रमुख बँका, आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या आणि अन्य आपत्कालीन सेवांवर परिणाम झाला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मायक्रोसॉफ्ट सर्व्हर कशामुळे झालं ठप्प?

मायक्रोसॉफ्टमुळे जगभरातील विमान सेवा विस्कळीत

सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने जगातील अनेक गोष्टींवर परिणाम
Microsoft Server: मुंबई: जगभरातील बऱ्याच लोकांना त्यांच्या विंडोज सिस्टमवर निळ्या स्क्रीनची समस्या भेडसावत आहे. मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर बंद झाल्यामुळे जगभरातील बँकांपासून एअरलाइन्सपर्यंतच्या सेवा विस्कळीत झाल्या आहेत. त्यामुळे जगभरात गोंधळ माजला आहे. कंपनीच्या फॉर्मवरील पिन संदेशानुसार, अनेक विंडोज यूजर्संना ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (BSOD)त्रुटी दिसत आहे. (microsoft cloud outage microsoft servers down worldwide confusion banks and airline flights disrupted across the world)
अलीकडेच करण्यात आलेल्या क्राउड स्क्रीम अपडेटनंतर ही समस्या येत आहे. या समस्येने मोठ्या प्रमाणात लोक त्रस्त झाले आहेत. मायक्रोसॉफ्टने ही माहिती दिली आहे. शुक्रवारी सकाळी त्यांची क्लाउड सेवा विस्कळीत झाल्यामुळे जगभरातील अनेक भागात समस्या निर्माण झाल्या आहेत.
हे ही वाचा>> Ladka Bhau Yojana GR: लाडका भाऊ योजनेचा जीआर लागू, पाहा तरुणांना नेमके कसे मिळणार पैसे?
त्यामुळे विमान कंपन्यांच्या उड्डाणांवर देखील परिणाम झाला आहे. यामुळे भारत आणि अमेरिकेसह अनेक देशांतील विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे.
Microsoft मध्ये का आली एवढी मोठी अडचण?
मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हिस हेल्थ स्टेटस अपडेटनुसार, या समस्येचे प्रारंभिक कारण Azure बॅकएंड वर्कलोड्सच्या कॉन्फिगरेशनमध्ये करण्यात आलेला बदल आहे. ज्यामुळे स्टोरेज आणि कम्प्युटर रिसोर्सेस यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत आणि परिणामी कनेक्टिव्हिटीची समस्या निर्माण होते आहे.