Anant ambani : ...अन मुकेश अंबानींच्या अश्रुंचा फुटला बांध
Anant Ambani pre wedding ceremony : अनंत अंबानी यांनी त्याच्या पालकांचे आभार मानले आहे आणि बालपणात आरोग्याबाबत झालेल्या संघर्षाबद्दल सांगितले आहे. या दरम्यान मुकेश अंबानी यांना अश्रू अनावर झाले होते. या संबंधित व्हिडिओ देखील समोर आला आहे.
ADVERTISEMENT
Anant Ambani pre wedding ceremony : देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडींग सोहळा सुरु आहे. गुजरातच्या जामनगरमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली आहे. या सोहळ्यात अनंत अंबानी यांनी त्याच्या पालकांचे आभार मानले आहे आणि बालपणात आरोग्याबाबत झालेल्या संघर्षाबद्दल सांगितले आहे. या दरम्यान मुकेश अंबानी यांना अश्रू अनावर झाले होते. या संबंधित व्हिडिओ देखील समोर आला आहे. (mukesh ambani emotional tears viral video anant ambani pre wedding ceremony radhika merchant)
ADVERTISEMENT
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडींग सोहळा तीन दिवस आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला देशातीलच नव्हे तर जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली आहे. या सोहळ्यात अनंत अंबानी यांनी त्यांना विशेष वाटल्याबद्दल पालकांचे आभार मानले आहे आणि बालपणात आरोग्याबाबत झालेल्या संघर्षाबद्दल सांगितले आहे. अनंत त्याचा हा प्रवास सांगत असताना मुकेश अंबानी भावूक झालेले आणि डोळ्यात पाणी आले होते.
हे ही वाचा : BJP च्या 195 उमेदवारांची यादी, महाराष्ट्रातील केवळ...
"माझ्या कुटुंबाने मला स्पेशल वाटावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण माझं पुर्ण आयुष्य गुलाबांचा बिछाना राहिलेलं नाही, मी काट्यांचा त्रास अनुभवला. मला लहानपणापासून आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागले, परंतु माझ्या आई-वडिलांनी मला त्याचा कधीही त्रास होऊ दिला नाही. मी कधी आजारपण सहन केलं असं मला वाटलच नाही. कारण ते नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले,'', असे अनंत सांगतो.
हे वाचलं का?
अनंत अंबानी पालकांचे आभार मानत असताना आणि बालपणातील आरोग्याबाबत झालेल्या संघर्षाबद्दल सांगत असताना त्याला अश्रू अनावर झाले होते. दरम्यान अनंतच्या या प्री वेडिंग सोहळ्यात जगातील काही श्रीमंत व्यक्तींसह 1,000 हून अधिक अतिथी उपस्थित आहेत. विशेष उपस्थितीत बिल गेट्स, मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग आणि अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांसारखे दिग्गज बॉलिवूड कलाकारही या सोहळ्याला उपस्थित आहेत.
हे ही वाचा : 2019 ला तिकीट कापलं, आज थेट मोदींचीच उमेदवारी जाहीर
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT