Bademiya: हे काय… मुंबईतील प्रसिद्ध ‘बडेमिया’च्या किचनमध्ये उंदीर-झुरळं, FDA ही अवाक्
Cockroach and Rats found in Bademiya kitchen: मुंबईतील प्रसिद्ध बडेमिया हॉटेल हे एफडीएकडून सील करण्यात आलं आहे. या हॉटेलच्या किचनमध्ये मोठ्या प्रमाणात उंदीर आणि झुरळं आढळून आले आहेत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

FDA raid on Mumbai’s famous Bademiya Restaurant: दीपेश त्रिपाठी, मुंबई: मुंबईच्या कुलाबा परिसरातील प्रसिद्ध बडेमिया (BADEMIYA) हॉटेल हे तेथील कबाब आणि तंदूरी पदार्थांसाठी खूपच प्रसिद्ध आहे. पण याच हॉटेलवर काल (13 सप्टेंबर) अन्न व औषध प्रशासन (Food and Drug Administration) च्या व्हिजिलन्स खात्याच्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकली. धक्कादायक बाब म्हणजे या हॉटेलमधील किचनमध्ये FDA च्या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात उंदीर आणि झुरळं आढळून आले. तसेच येथे प्रचंड अस्वच्छता असल्याचंही पाहायला मिळालं. (mumbai famous bademiya hotel sealed fda raid after cockroach and rats found in kitchen)
ज्यामुळे आता या हॉटेलवर एफडीएकडून कारवाई करण्यात आली आहे. येथील किचन हे सील करण्यात आले आहेत. याशिवाय महत्त्वाची बाब म्हणजे बडेमियासारख्या मोठ्या हॉटेलकडे FSSAI परवानाच नाही. त्यामुळेच 76 वर्ष जुन्या हॉटेलवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
‘बडेमियाच्या किचनमध्ये सापडले झुरळ आणि उंदीर’
याच प्रकरणी एफडीएचे व्हिजिलेन्स असिस्टेंट कमिश्नर विलास इंगळे यांनी मुंबई Tak शी खास बातचीत करताना माहिती दिली की, ‘मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट याची तपासणी सुरू आहे. जे नामांकित हॉटेल्स आहेत तिथे नामांकित लोकं जातात.. तसेच इतर हॉटेल्सची देखील आता तपासणी सुरू आहे. त्यापैकीच बडेमिया हॉटेलही आहे. एका मोहिमेअंतर्गत आमची व्हिजिलन्सची टीम आणि आमचे लोकल अधिकारी आले होते. इथे आल्यानंतर आम्हाला असं पाहायला मिळालं की, यांचे दोन सेंट्रल किचन आहेत. जिथे जेवण बनवलं जातं. तसेच बाजूलाच असलेल्या आऊटलेटमध्ये ग्राहकांना जेवण दिलं जातं.’
‘पण सेंट्रल किचनची पाहणी केल्यानंतर आम्हाला आढळून आलं की, ते परवान्याशिवायच सुरू आहे. जिथे आम्हाला उंदीर आणि झुरळं आढळून आले. संपूर्ण किचनमध्ये मोठ्या प्रमाणात उंदीर आणि झुरळं होतीच पण प्रचंड अस्वच्छता देखील होती.’