Mumbai Police : नियम मोडणाऱ्यांचा रंग उतरवला, मुंबई पोलिसांनी वसुल केला पावणे 2 कोटी रुपयांचा दंड

मुंबई तक

मुंबई पोलिसांनी मुंबईतील मुख्य ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. या काळात नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 17,495 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई

point

हजारो वाहनचालकांवर कारवाई, कोट्यवधींचा दंड वसूल

point

विना हेल्मेट वाहन दुचाकी चालवणाऱ्या 4 हजार 949 वर कारवाई

Mumbai Traffic Police : राज्यभर होळी आणि धुळवडीचा सण मोठ्या जल्लोषात पार पडला.  एकीकडे रंगांची उधळण होत असते आणि दुसरीकडे अनेकजण बेफाम होऊन दारूच्या नशेत गाड्या चालवतात, वाहतूक नियम मोडतात. अशाच वाहनचालकांवर काल मुंबई पोलिसांनी नाकेबंदी करत कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल केला. 

धुळवडीच्या दिवशी मुंबई वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. यादरम्यान, 1.79 कोटी रुपयांची 17,495 चालान फाडण्यात आले. मुंबई पोलिसांनी मुंबईतील मुख्य ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. या काळात नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली.

हे ही वाचा >> Beed : "...म्हणून मी जीवन संपवतोय", त्रास देणाऱ्यांची नावं लिहून फेसबूक पोस्ट करत शिक्षकाचं टोकाचं पाऊल, बीड हादरलं

मुंबई पोलीस आणि वाहतूक विभागाने होळी आणि धुळवड म्हणजेच 13 आणि 13 मार्चला दोन दिवस वाहतूक नियमांचं उल्लंघन रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती. या कालावधीत, नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 17,495 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून तब्बल 1 कोटी 79 लाख 79 हजार 250 रुपये वसूल करण्यात आले.

मुंबई पोलिसांनी ड्रायव्हर्ससाठी मार्गदर्शक तत्वांची माहिती दिली होती. त्याचसोबत 'कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत' याची माहितीही दिली होती. नियमांचं पालन न केल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो, असं पोलिसांनी सांगितलं होतं. याशिवाय ज्या ठिकाणी वाहतूक नियमभंग होण्याची शक्यता होती त्या ठिकाणी विशेष मोहीम राबवण्यात आली.

हे वाचलं का?

    follow whatsapp