Beed : "...म्हणून मी जीवन संपवतोय", त्रास देणाऱ्यांची नावं लिहून फेसबूक पोस्ट करत शिक्षकाचं टोकाचं पाऊल, बीड हादरलं

मुंबई तक

"हे लोक मला हाल हाल करुन मारतील, मोठे लोक मला मारतील, मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही" अशा अनेक पोस्ट धनंजय नागरगोजे यांच्या फेसबूकवर टाकलेल्या दिसल्या.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

"श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर"

point

"18 वर्षे झालं काम करतोय अजून मला पगार नाही"

point

"माझा खूप छळ लावला आहे. मला हे हाल हाल करून मारणार"

point

शिक्षकाने सविस्तर फेसबूक पोस्ट लिहून स्वत:ला संपवलं

Beed Crime News : बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गुन्हेगारीची मालिका अजूनही थांबायचा नाव घेत नाहीये. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर संपूर्ण वातावरण ढवळून निघालं.  त्यानंतर अनेक अशी प्रकरणं समोर आली, ज्यामध्ये गुन्हेगारांचे क्रूर रूपं समोर आलेले दिसले होते. त्यानंतर आता पुन्हा एका घटनेनं बीड हादरलंय. एका शिक्षकाने बँकेच्या बाहेर फाशी घेऊन, स्वत:ला संपवलं. तसंच टोकाचा निर्णय घेण्याआधी गंभीर आरोप करत एक फेसबूक पोस्टही टाकली.

हे ही वाचा >> रंग खेळायला नदीत गेले, पुण्यात तिघे आणि नवी मुंबईत चार जण बुडाले

"हे लोक मला हाल हाल करुन मारतील..."

बीड शहरातील कृष्णा अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेडच्या केज शाखेजवळ ही घटना घडली. धनंजय अभिमान नागरगोजे या 30 वर्षीय शिक्षकाने स्वत:चं आयुष्य संपवताना लिहिलेल्या पोस्टमध्ये आरोपींच्या नावाचाही उल्लेख केला आहे. केज तालुक्यातील देवगावमध्ये राहणाऱ्या धनंजय नागरगोजे यांनी टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी अनेक फेसबूक पोस्ट केल्या. "हे लोक मला हाल हाल करुन मारतील, मोठे लोक मला मारतील, मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही" अशा अनेक पोस्ट धनंजय नागरगोजे यांच्या फेसबूकवर टाकलेल्या दिसल्या. तसंच स्वत:ला संपवण्याआधी एक सविस्तर पोस्ट करत आपल्या मुलीची माफी मागितली आणि त्रास देणाऱ्यांची नावंही लिहिली आहेत.

धनंजय नागरगोजेंची शेवटची फेसबूक पोस्ट...

"श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफकर, मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही. बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पहितली होती पण त्या स्वणाना स्वप्नातच ग्रहण लागले काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही .कधी मी कुणाला दोन रू ला फसवल नाही किंवा कुणाचं कर्ज पण घेतल नाही .

श्रावणी बाळा शक्य झालंच तर कर एकदा तुझ्या बापूला माफ कारण तुला मी एकट्याला सोडून  जात आहे .तुला आजुन काही कळत नाही तुझ वय आहेच किती, तीन वर्षे तुला काय कळणार ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही.बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांगला लवागला पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp