Manoj Jarange Patil : ‘राहुल गांधींना शुभेच्छा’, जरांगे ‘त्या’ विधानावर काय बोलले?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Manoj Jarange greetings to Rahul gandhi over reservation qouta
Manoj Jarange greetings to Rahul gandhi over reservation qouta
social share
google news

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, राहुल गांधी असं म्हणाले की, ‘इंडिया आघाडीचे सरकार आलं, तर आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना करणार.’ राहुल गांधी केलेल्या या विधानाबद्दल मनोज जरांगे पाटलांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर जरांगे पाटलांनी त्यांची भूमिका मांडली. (what did Manoj Jarange Patil say on Rahul Gandhi’s statement about reservation quota)

ADVERTISEMENT

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत जरांगे पाटलांना राहुल गांधींनी आरक्षणाच्या मुद्द्यावर मांडलेल्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

मनोज जरांगेंनी काय दिले उत्तर?

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “इतक्या दिवसांनी? ठिके, तो त्यांचा विषय आहे. आमचं आरक्षण आता मिळत आलं आहे. जवळपास होत आलं आहे. पण, ठिक आहे. करु द्या त्यांना काय करायचं ते. म्हटल्याबद्दल त्यांना शुभेच्छा.”

हे वाचलं का?

हेही वाचा >> नेहरू भारतीयांना खरंच आळशी म्हणाले होते का? 1959 मधील ‘त्या’ भाषणात काय?

“आमचं असं धोरण आहे की, कुणी म्हणो, मराठ्यांना आरक्षण देणारं पाहिजे. मग हे असो नाहीतर ते… आम्हाला काही देणंघेणं नाहीये, तुमच्या पक्षाचं… नेत्याचं. काही नाही. आमचं ध्येय आरक्षण आहे. मग कुणीही द्या. आमचं हे होत आलं आहे. आल्यातच जमा आहे. पण जाऊद्या मराठा आरक्षणाबद्दल त्यांनी शब्द काढला.

शंभूराज देसाईंना सुनावलं

जरांगे पाटलांनी सारखं सारखं आंदोलन करू नये, असे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई म्हणाले होते. त्यांनी केलेल्या विधानावरून जरांगे पाटलांनी सुनावलं. ते म्हणाले, “तुम्ही १५ तारखेला अधिवेशन ठेवलं आहे. हरकतींची १६ तारीख आहे. १५ तारखेला कायद्याची अंमलबजावणी व्हायलाच पाहिजे.”

ADVERTISEMENT

हेही वाचा >> अजित पवार-जितेंद्र आव्हाडांतील संघर्ष टोकाला! ‘नाटकीबाज’वर म्हणाले ‘कावळा’

“गुन्हेही दोन-तीन दिवसांत मागे घेतो म्हणाले होते, त्याला आता दोन-तीन महिने झाले आहेत. हैदराबाद संस्थानचं गॅझेट घ्यायला समितीकडे दिले की नाही, हे आम्हाला सांगा? देसाईंनाच आमचं म्हणणं आहे की हे गॅझेट समितीने घेतलंय का?”, असा प्रश्न जरांगेंनी देसाईंना विचारला आहे.

ADVERTISEMENT

जरांगे पाटलांचे सवाल

“23 डिसेंबरपासून समितीने काही नोंदी शोधल्यात का? की फक्त कागदावर बढती आहे. हेही सांगा. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात ज्यांच्या नोंदी मिळाल्यात त्यांची यादी लावणार का? फक्त ८ टक्के ग्रामपंचायतीमध्येच लागल्या आहेत. शिबिरं बंद पडली आहेत का?”, असेही जरांगे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >> 38 विरुद्ध 62… प्रशांत किशोरांनी सांगितला भाजपला हरवण्याच्या फॉर्म्युला

“मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारने स्वीकारला का? स्वीकारला असेल, तर तो सुप्रीम कोर्टात मांडणार आहेत, का? नेमकी काय काय प्रक्रिया चालली आहे, ती आम्हाला माहिती होणं गरजेचं आहे. ओबीसींच्या सवलीत आरक्षण मिळेपर्यंत दिलंय का? सग्यासोयरे शब्दाच्या अंमलबजावणीबद्दल त्यांचा काय खुलासा आहे?”, असे प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT