Nanded Hospital मध्ये मृत्यूचे थैमान! पुन्हा 4 बालकांसह 7 रुग्णांचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

nanded hospital death news in marathi : Another 7 patients died in Shankarao Chavan Government Hospital in Nanded. It includes 4 children.
nanded hospital death news in marathi : Another 7 patients died in Shankarao Chavan Government Hospital in Nanded. It includes 4 children.
social share
google news

-कुवरचंद मंडले, नांदेड

ADVERTISEMENT

Nanded hospital death news in Marathi : नांदेडचं डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय राज्यात चर्चेचा विषय ठरलंय. उपचारादरम्यान रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडालीये. 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा 4 बालकांसह 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (patients death figure increased in Nanded government hospital)

ठाणे महापालिकेच्या मुंब्रा येथील रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर आता नांदेडमधील शासकीय रुग्णालयात अशीच घटना घडली. 24 तासांत उपचार घेत असलेल्या 24 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य विभागात चाललंय काय? असा प्रश्न विचारला जात आहे. आता या रुग्णालयातील आणखी 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा >> Nanded Hospital : ‘तीन पक्ष ठणठणीत बाकी महाराष्ट्र…’; राज ठाकरे शिंदे सरकारवर कडाडले

मागील 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात 12 नवजात बालकांचा समावेश आहे. या घटनेनंतर सोमवारी (1 ऑक्टोबर) रात्री पुन्हा अत्यवस्थ असलेल्या चार नवजात बालकांसह सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मागील 36 तासांत 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नांदेडच्या हॉस्पिटलमध्ये काय घडलं?

मराठवाड्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात 30 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजेपासून ते 1 ऑक्टोबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत 24 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या दीड ते तीन दिवसांच्या नवजात बालकांचा समावेश आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> 2024 मध्ये ‘एक देश-एक निवडणूक’ होणार? मोठी बातमी आली समोर…

यासोबतच सर्प दंश, विष प्राशन आणि इतर आजारांवर उपचार घेत असलेल्या 12 रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, पुन्हा 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात चार नवजात बालकांचा समावेश असल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

Nanded Hospital Death : 38 बालकांची प्रकृती चिंताजनक

सात रुग्णांच्या मृत्यूनंतर मागील ४८ तासांत मृतांचा आकडा 31 पर्यंत पोहचला आहे. त्यात 16 नवजात बालकांचा समावेश आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात सध्या 138 नवजात बालकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यात 38 नवजात बालकांची प्रकृती अत्यवस्थ आहे.

हेही वाचा >> ‘…तर त्या माणसाला आयुष्यातून उठवायचं?’, ‘मनातील मुख्यमंत्री’वरुन पंकजा मुंडेंचा कोणावर निशाणा?

इतर २५ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणामुळे रुग्ण मृत्यू पावत असल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे. शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढल्याने रुग्णालयातील सेवेबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT