“आई, मी जे केलंय, ते…”, लोकसभेत घुसणाऱ्या सागरने कुटुंबीयांना काय सांगितलं?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

parliament security breach case sagar sharma video call
parliament security breach case sagar sharma video call
social share
google news

Parliament Security Breach, Sagar Sharma Video Call with Family : संसदेची सुरक्षा भेदून घुसखोरी करणाऱ्या सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या सहाही आरोपींची आता चौकशी सूरू आहे. या चौकशीतून आता नवनवीन खुलासे समोर येत आहे. त्यात आता या प्रकरणातील आरोपी सागर शर्माची त्यांच्या कुटुंबियांशी व्हिडिओ कॉलवर बोलणी करून दिली आहे. या दरम्यान कुटुंबियांशी बोलताना ‘आई, मी जे केले ते बरोबरच केले, मला ते योग्य वाटते’ अशी कबूली सागर शर्माने दिली आहे. (parliament security breach case sagar sharma video call family lucknow accused delhi police)

दिल्लीहून आलेल्या स्पेशल सेल टीमने लखनऊच्या सागर शर्माची त्याच्या कुटुंबीयांशी व्हिडिओ कॉलवर बोलणी करून दिली. साधारण 40 मिनिटे व्हिडिओ कॉलवर ही बोलणी झाली. यादरम्यान सागरने कुटुंबीयांना सांगितले की, ‘आई, मी जे केले ते बरोबरच केले, मला ते योग्य वाटते’, असे सांगितले. दरम्यान नेमकं या 40 मिनिटाच्या संवादात सागरची त्याच्या कुटुंबियांशी काय काय चर्चा झाली, हे जाणून घेऊयात.

हे ही वाचा : Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला दिलं विष? कराचीत घेतोय उपचार

व्हिडिओ कॉलवरील संवाद…

सागर : आई, घरी सर्व ठीक आहे का, काही अडचण आहे का?
आई : बेटा तू काय केलेस?
सागर : आई, मी जे केले ते बरोबरच केले. मला ते योग्य वाटते. मी ते कोणाच्या सांगण्यावरून केलेले नाही. चौकशीनंतर मला लवकरच सोडण्यात येईल.
सागर : आई, तुझी आणि माहीची काळजी घे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या दरम्यान सागर शर्माने लखनऊ आणि इतर काही ठिकाणच्या त्याच्या घराबाबत महत्त्वाच्या कागदपत्रांची माहिती दिली. ज्यांना पोलिसांनी सोबत नेले आहे. दिल्लीतील स्पेशल सेल टीमला सागरच्या खोलीतून 4 बँक खात्यांची पासबुक सापडली आहेत. या व्यवहाराची चौकशी करण्यात येत आहे. या खात्यांमध्ये कधी, कुठे आणि किती पैशांची देवाणघेवाण झाली, याची माहिती गोळा केली जात आहे.याशिवाय खोलीत पॉकेट डायरी, पुस्तके, फाइल्स, तिकिटे आदी साहित्य सापडले. सागरच्या वडिलांच्या सहीनंतर ते जप्त करण्यात आले आहे. तपास यंत्रणेने आरोपी सागर शर्माचे आई-वडील आणि बहिणीला एकत्र बसवून चौकशी केली. याआधी यूपी एटीएसने सागरच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली आहे.

हे ही वाचा : Shiv sena UBT : “अदानींनी मिंधे, पवारांसह पन्नासएक आमदार-खासदारांना…”

यूपी एटीएस आणि इंटेलिजन्स टीमनेही सागरच्या लखनऊ येथील घरी पोहोचून या प्रकरणाची चौकशी केली. आरोपी सागर शर्मा याला बॅटरी रिक्षा देणारे ननके आणि त्याचा मुलगा हिमांशू यांचीही पथकाने चौकशी केली आहे. ज्यामध्ये सागरने बँकांशी संपर्क साधल्याचे समोर आले आहे. त्यांनी निधी उभारण्याचा प्रयत्न केला. त्याला स्वतःची नवीन ई-रिक्षा घ्यायची आहे.

ADVERTISEMENT

या प्रकरणात ननके यांनी सांगितले की, सागर मला दररोज 500 रुपये ई-रिक्षाचे भाडे देत असे. हा त्याचा निश्चित कोटा होता. तो सकाळी नऊ वाजता ई-रिक्षा घेऊन रात्री आणायचा. तसेच सागरला बँकेतूनही फोन आला होता. त्यावर सागरने आपल्याला पैशांची नितांत गरज असल्याचे सांगितले होते. म्हणूनच त्याला कर्ज घ्यायचे आहे. कर्जाची संपूर्ण रक्कम लवकरच फेडणार असल्याचं त्याने सांगितलं होतं, कारण त्याची वेळ बदलणार होती, असे त्याचे म्हणणे होते.

ADVERTISEMENT

संसदेत गोंधळ घालणाऱ्या सागर शर्माने 700 रुपयांना एक खास बूट बनवला होता, ज्यामध्ये त्याने धुराची कॅन आत लपवली होती. पोलिसांनी सांगितले की, सागर शर्माने आठ क्रमांकावरील फुटवेअर शोरूममधून दोन जोड शूज खरेदी केले होते. त्या दुकानदाराचीही चौकशी करण्यात आली आहे. तसेच सागर शर्माच्या खाजगी बँक खात्यातून विमानाचे तिकीट खरेदी केल्याचेही तपासात समोर आले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT