Exclusive Interview: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इंडिया टुडे ‘न्यूजमेकर ऑफ द इयर’ म्हणून निवड

मुंबई तक

ADVERTISEMENT

pm modi exclusive interview prime minister narendra modi elected india today newsmaker of the year 2023
pm modi exclusive interview prime minister narendra modi elected india today newsmaker of the year 2023
social share
google news

PM Narendra Modi Exclusive Interview: नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इंडिया टुडेच्या ‘न्यूजमेकर ऑफ द इयर 2023’ म्हणून निवड झाली आहे. पंतप्रधान मोदी हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या वर्षभरात बरेच चर्चेत राहिले आहेत. (pm modi exclusive interview prime minister narendra modi elected india today newsmaker of the year 2023)

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया टुडेचे मुख्य संपादक आणि अध्यक्ष अरुण पुरी, उपाध्यक्ष कली पुरी आणि समूह संपादकीय संचालक राज चेंगप्पा यांच्याशी विशेष संवाद साधला. या संभाषणातच, पंतप्रधान मोदींनी वर्षातील न्यूजमेकर म्हणून निवड झाल्याबद्दल सांगितले की, ‘हा सन्मान दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. पण माझ्यासाठी या वर्षात अनेक न्यूजमेकर होते.’

पंतप्रधान मोदींनी देशातील शेतकरी, कामगार, खेळाडू आणि नागरिकांचे या वर्षाचे न्यूजमेकर म्हणून वर्णन केले. ते म्हणाले की, ‘आमचे शेतकरी जे विक्रमी कृषी उत्पादन घेत आहेत आणि जगभरात क्रांती आणत आहेत, आमचे लोक ज्यांनी G20 ला देशभरात प्रचंड यश मिळवून दिले. आपल्या कौशल्याने यशाचा मार्ग मोकळा करणारे आपले विश्वकर्मा. आमचे खेळाडू ज्यांनी आशियाई खेळ, आशियाई पॅरा गेम्स आणि इतर अनेक स्पर्धांमध्ये आपल्या देशाची मान उंचावली. नवनवीन विक्रम निर्माण करणारी आपली तरुणाई, मग ती स्टार्टअप्स असो वा विज्ञान, सर्वच क्षेत्रात नवीन उंची गाठणारी आपली स्त्रीशक्ती, विशेषत: आता जेव्हा महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या माध्यमातून सक्षमीकरणाची नवी कथा लिहिली जात आहे.’ हे सगळे जण न्यूजमेकर आहेत असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Exclusive Interview: ‘…म्हणून BJP ने नवे मुख्यमंत्री निवडले’, PM मोदींनी सांगितली Inside स्टोरी

पंतप्रधान पुढे म्हणाले की, ‘हे माझे भाग्य आहे की मी अनेक वर्षांपासून देशवासीयांची सेवा करत आहे. या काळात आपण अनेक यश आणि आव्हाने पाहिली आहेत.’

जग अनेक संकटातून जात असताना पंतप्रधान मोदींनी भारताला नव्या उंचीवर नेले आहे. रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास ही दोन मोठी युद्धे असोत, कोरोनाचा कहर असो की जागतिक आर्थिक मंदी. भारताने या परिस्थितीत केवळ चांगली कामगिरी केली नाही तर जगासाठी आशेची ज्योतही तेवत ठेवली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतात अनेक सुधारणावादी पावले उचलली गेली. या वर्षी सप्टेंबरमध्ये महिलांसाठी 33 टक्के आरक्षण विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. डिसेंबरमध्ये सरकारने फौजदारी कायद्यात सुधारणा केल्या. यासोबतच ब्रिटिशकालीन जुने कायदे बदलून नवे कायदे करण्यात आले.

पीएम मोदींच्या इतर ऐतिहासिक सुधारणावादी पावलांमध्ये कलम 370 हटवण्याचा समावेश आहे, ज्याला डिसेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली. जागतिक स्तरावर अर्थव्यवस्था मंदावलेली असताना, 2023 मध्ये वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला. मोदी सरकारने गरिबांसाठीच्या कल्याणकारी योजनांवर भर दिला. मोफत एलपीजी, हेल्थ कार्ड आणि गरिबांसाठी गृहनिर्माण योजनांनंतर त्यांनी लाखो घरांना शुद्ध पाणी दिले.

हे ही वाचा>> Exclusive Interview: भारताला विकसित करण्यासाठी PM मोदींचा खास मंत्र, म्हणाले GYAN…

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, भारताने G20 चे यशस्वीपणे अध्यक्षपद भूषवले आणि ग्लोबल साउथच्या आवाजाचे जोरदार प्रतिनिधित्व केले. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान G20 जाहीरनाम्यावर सर्वांना एकत्र आणणे हा भारताचा सर्वात मोठा राजकीय विजय होता.

रशिया-युक्रेन युद्धावरील G20 संयुक्त घोषणेसाठी सर्व भागीदारांना सहमती मिळणे हा भारताचा मोठा राजकीय विजय होता. अरब देशांपासून अंतर न राखता इस्रायलवरील हमासच्या हल्ल्यावर टीका करून मध्यपूर्वेतील समतोल राखण्यात भारताला एकप्रकारे यश आले. गाझातील युद्धग्रस्त लोकांसाठी मोदी सरकारने मदतही पाठवली.

हे वर्ष सरत असले तरी मोदी सरकारसाठी ते सुखद होते. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपने हिंदी पट्ट्यातील तीन राज्यांत दणदणीत विजय मिळवला. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपच्या विजयामुळे पंतप्रधानांचा दर्जा वाढला आहे यात शंका नाही. भाजप सध्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT