Manatralaya: सरकारला हादरा, मंत्रालयात तुफान राडा; सुरक्षा जाळ्यांवर शेकडो जणांच्या उड्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Farmers, Mantralaya Wardha dam victims protested jumping safety net ministry
Farmers, Mantralaya Wardha dam victims protested jumping safety net ministry
social share
google news

Wardha dam affected : अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी (Wardha) आज मंत्रालयात लावण्यात आलेल्या सुरक्षाजाळीवर उड्या मारुन आंदोलन केले. गेल्या 105 दिवसांपासून मोर्शीमध्ये धरणग्रस्तांनी आंदोलन पुकारले होते. मात्र त्याकडे ना शासन गेले ना सरकार गेले. त्यामुळे आता गेल्या 45 वर्षापासून प्रलंबित असलेल्या धरणग्रस्तांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी धरणग्रस्तांनी मंत्रालयातील सुरक्षाजाळीवर उड्या मारून प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन केले. त्यामुळे आता वर्धा धरणग्रस्तांचा प्रश्न ऐरणीवर आला असून आता संबंधित खात्याचे मंत्री काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (protest by wardha dam victims jumping over safety net in mantralaya arrested by police)

प्रकल्पग्रस्तांकडे 45 वर्षे दुर्लक्ष

वर्धा धरणग्रस्तांचा मागील 45 वर्षापासूनचा प्रश्न प्रलंबित आहे. तर गेल्या 105 दिवसांपासून मोर्शीमध्ये धरणग्रस्तांनी आंदोलनही केले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेऊन संबंधित मंत्र्यांबरोबर चर्चा करुन प्रश्न सोडवण्याबाबत चर्चा केली होती. मात्र तरीही सरकारने त्यांची दखल घेतली नसल्यामुळेच आज प्रकल्पग्रस्तांनी मंत्रालयात येऊन सुरक्षा जाळीवर उड्या मारून आंदोलन केले. त्यामुळे मंत्रालयातील पोलिसांची मोठी धावपळ उडाली.

हे ही वाचा >>Santosh Bangar : आमदार बांगर आले जोशात अन्.. थेट पोलिसातच गुन्हा दाखल !

सुरक्षा जाळीवर उड्या

सुरक्षाजाळीवर उड्या मारुन आंदोलन केल्याने पोलिसांनी आंदोलकांना धरपकड करुन त्यांना सुरक्षाजाळीवरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला.मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या मारुन आंदोलन केल्यामुळे आता प्रकल्पग्रस्तांवर कारवाई होणार असल्याचेही बोलले जात आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

चौथी पिढी अन्यायग्रस्त

वर्धा धरणग्रस्तांनी सरकारकडे गेल्या 45 वर्षापासून आमच्या जमिनींना योग्य मोबदला द्या, प्रकल्पग्रस्तांना नोकरी द्या, आमच्या तीन पिढ्यानी प्रकल्पग्रस्त असल्यामुळे त्याचा त्रास भोगला आहे. त्यामुळे आमची चौथी पिढी आली तरीही वर्धा धरणग्रस्तांचे प्रश्न मिठले नाहीत. त्यामुळेच मंत्रालयात येऊन हे आंदोलन केले असल्याचे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले.

हे ही वाचा >> Chhagan Bhujbal: तेलगी प्रकरणात चार्जशीटमधील नाव खोडणारा अदृश्य हात कुणाचा?, जितेंद्र आव्हाडांच सूचक ट्वीट

    follow whatsapp

    ADVERTISEMENT