पुणे : 'सपनाचा नाद सोड, अन्यथा...' जेलमधून बाहेर आला अन् झाला गेम, एकतर्फी प्रेमातून हत्या
पुण्यात एकतर्फी प्रेमातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तो नुकताच तुरुंगातून जामीनावर बाहेर आला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुणे : 'सपनाचा नाद सोड, अन्यथा...
जेलमधून बाहेर आला अन् झाला गेम
एकतर्फी प्रेमातून हत्या
Pune Crime : पुण्यातील काळेवाडी परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथे एकतर्फी प्रेमाच्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुभान अमित शेख असे मृत तरुणाचे नाव असून, विशेष म्हणजे पाच महिन्यांपूर्वी आपल्या प्रेयसीवर जीवघेणा हल्ला केल्याच्या आरोपाखाली तो तुरुंगात होता. अवघ्या पाच दिवसांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता, मात्र बाहेर येताच त्याची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
नुकताच तुरुंगातून आला होता बाहेर
मिळालेल्या माहितीनुसार, सुभानचे सपना नावाच्या तरुणीवर एकतर्फी प्रेम होते, मात्र तिने त्याचा प्रस्ताव वारंवार फेटाळला होता. सपनाच्या आईचाही या नात्याला कडाडून विरोध होता. याच रागातून पाच महिन्यांपूर्वी सुभानने सपनावर चाकूने हल्ला करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्याखाली पोलिसांनी त्याला अटक केली होती. पाच महिने तुरुंगात काढल्यानंतर तो जामिनावर सुटला, पण त्याच्या येण्याने पीडित तरुणीच्या कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
हे ही वाचा : बायकोचा राग काढला वडिलांवर, डोक्यात खुर्ची घालून संपवले; नेमकं काय घडलं?
सपनाचा नाद सोड, अन्यथा..
सुभान पुन्हा एकदा सपनाला इजा पोहचवू शकतो या भीतीने तिची आई जयश्री कदम यांनी आपले परिचित विशाल सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी यांना याबद्दल माहिती दिली होती. सुभानला 'सपनाचा नाद सोड, अन्यथा परिणाम वाईट होतील' अशी तंबीही देण्यात आली होती. मात्र, गुरुवारी रात्री 11 च्या सुमारास हा वाद विकोपाला गेला. विशाल आणि अनिकेतने सुभान शेख आणि त्याचा मित्र हर्षद शेख यांच्यावर चाकू आणि चॉपरने हल्ला केला. सुभानच्या हात, पोट आणि मानेवर वार करण्यात आले.
हे ही वाचा : 105 जवान अन् जंगलात 48 तास सर्च ऑपरेशन, अकोला अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक
उपाचारापूर्वीच मृत्यू
गंभीर जखमी झालेल्या सुभानला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच काळेवाडी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या काही तासांत मुख्य आरोपी विशाल सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी यांना बेड्या ठोकल्या. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









