Nanded Hospital : ‘तीन पक्ष ठणठणीत बाकी महाराष्ट्र…’; राज ठाकरे कडाडले
नांदेड येथील शासकीय रुग्णालयात २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाला. यात १२ बालकांचा समावेश आहे. या घटनेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदे सरकारला फटकारले आहे.
ADVERTISEMENT

Nanded Hospital news in marathi : नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आधी 24 तर नंतर 7 अशा तब्बल 31 रुग्णांचा मृत्यू झाला. या मृत्यू तांडवाने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. औषधांच्या तुटवड्यामुळे हे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ३१ रुग्णांच्या मृत्यूवरून राज ठाकरेंनी सरकारवरचा ठाकरे शैलीत समाचार घेतला आहे. (MNS Chief Raj Thackeray First Reaction on patient death in Nanded hospital)
नांदेडमधील शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूबद्दल राज ठाकरेंनी दुःख व्यक्त केले आहे. राज ठाकरेंनी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे घडलेल्या घटनेचाही उल्लेख केला आहे. “नांदेडमधल्या सरकारी रुग्णलयात गेल्या 24 तासात 24 मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली.”
औषध तुटवड्यावर राज ठाकरेंचं बोट
“राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे ‘औषध पुरवून वापरा’ असा सल्ला दिला जातोय असं कळतंय. आणि ह्या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत”, असं सांगत राज ठाकरेंनी राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे काढले आहेत.
हेही वाचा >> Nanded : आधी ठाण्यात, आता नांदेडला ‘मिंधे सरकार’…,नांदेड मृत्यू प्रकरणात ठाकरेंचा संताप
राज ठाकरेंनी ठाकरे शैलीत सत्तेत असलेल्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गटाचा समाचार घेतला. राज ठाकरेंनी म्हटलंय की,”तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल, तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये पण महाराष्ट्राचं काय?”, असा सवाल करत राज यांनी सरकारमधील तिन्ही पक्षांना कोंडीत पकडलं.