Ram Mandir : प्रभू श्रीरामाला सोन्याचा 6 किलोंचा हिरेजडित मुकूट, किती आहे किंमत?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ram mandir pran pratistha pm narendra modi gujarat diamond trader donate 6kg golden crown
ram mandir pran pratistha pm narendra modi gujarat diamond trader donate 6kg golden crown
social share
google news

Gujarat Diamond Trader Donate golden crown Ram Mandir : अयोध्येत सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांच्या हस्ते राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्ला विधिवत पद्धतीने राम मंदिरात विराजमान झाले आहेत. यानंतर आजपासून रामलल्लांच्या दर्शनासाठी रांग लागली आणि दान करण्यासही सुरुवात झाली आहे. त्यात आता गुजरातच्या एका हिरे व्यापाऱ्याने रामलल्लाच्या मूर्तीसाठी 6 किलोचा मुकूट दान केला आहे. हा मुकूट दान करण्यासाठी हिरे व्यापारी त्यांच्या कुटुंबियांसह अयोध्येत पोहोचले होते. (ram mandir pran pratistha pm narendra modi gujarat diamond trader donate 6kg golden crown)

गुजरातच्या सूरत येथील ग्रीन लॅब डायमंड कंपनीचे मालक मुकेश पटेल यांनी अयोध्येतील राममंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीसाठी सोनेरी ‘मुकुट’ दान केला आहे. 11 कोटी रुपये किंमतीचा हा मुकूट या मुर्तीसाठी खास तयार करण्यात आला होता. सोने, हिरे आणि मौल्यवान रत्नजडित हा मुकुट आहे. या सोनेरी मुकूटाचे वजन 6 किलोग्रॅम आहे.

हे ही वाचा : Uddhav Thackeray : “भाजपमुक्त श्रीराम”, ठाकरेंनी भाजपवर डागली टीकेची तोफ

हिरे व्यावसायिक मुकेश पटेल यांनी त्यांच्या कुटुंबियांसह अयोध्येत जाऊन राम मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना हा मुकूट भेट दिला होता. राम मंदिराचे मुख्य पुजारी आणि श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या विश्वस्तांच्या उपस्थितीत मुकेश पटेल यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मुकूट सुपूर्द करण्यात आला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुकेश पटेल यांनी नव्याने बांधलेल्या मंदिरात स्थापित केलेल्या रामाच्या मूर्तीसाठी काही दागिन्यांचे योगदान दिले आहे. पटेल यांनी सोन्याचा मुकूट आणि इतर दागिने दान करण्याचा निर्णय घेतला आहे. हे दान त्यांनी रामलल्लाच्या मुर्तीसाठी केले आहे. या मुकूटावर 4 किलोग्रॅम सोन्यासह हिरे, माणिक, मोती आणि विविध आकाराचे रत्नजडित आहेत,अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष दिनेश भाई नविया यांनी दिली. विशेष म्हणजे मुकूट तयार करण्यापूर्वी पटेल यांनी कंपनीतील दोन कर्मचाऱ्यांना पुतळ्याचे मोजमाप करण्यासाठी अयोध्येला पाठवले, त्यानंतर मुकूटाच्या कामाला प्रत्यक्षरीत्या सुरूवात झाली होती.

हे ही वाचा : Ram Mandir : कपाळी टिळा, रत्नजडित दागिने… रामलल्लाच्या अलौकिक श्रृंगाराचे वैशिष्ट्य काय?

दरम्यान सोमवारी 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील रामलल्लाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.  यावेळी लाखो करोडो रामभक्तांनी हा सोहळा टीव्हीवरून पाहुन प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद घेतला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT