Rohit Pawar : अजित पवारांशीच पंगा! रोहित पवार म्हणाले, “टीका मी पचवून घेईन, पण…”

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

NCP Political Crisis : Rohit pawar reply to ajit pawar
NCP Political Crisis : Rohit pawar reply to ajit pawar
social share
google news

Rohit Pawar Ajit Pawar : राष्ट्रवादीचा (अजित पवार गट) निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या समारोपाच्या भाषणात अजित पवारांनी शरद पवारांसह त्यांच्यासोबत असलेल्यांवर निशाणा साधला. अजित पवारांनी रोहित पवारांनाही कानपिचक्या लगावल्या. अजित पवारांनी केलेल्या टीकेला आता रोहित पवारांनी उत्तर दिले आहे.

ADVERTISEMENT

“आता आपल्याला पुढे जायचे आहे. पुढे जात असताना कोणीतरी काहीतरी अधन मधन बोलत असतं. तसल्यांना मला उत्तरही द्यायचं नाहीये. गुडघ्याला बाशिंग बांधून कुठे काय फिरायला लागले. संघर्ष… अरे कशाचा संघर्ष? कधी आयुष्यात संघर्ष केला नाही आणि आता कशाचा संघर्ष?”, अशा शब्दांत अजित पवारांनी रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेचा समाचार घेतला.

अजित पवारांना इशारा आणि आव्हान; वाचा रोहित पवारांची पोस्ट…

“आदरणीय अजित दादा,

हे वाचलं का?

युवांच्या मागण्यांसाठी आम्ही सर्व युवा पुणे ते नागपूर असा 800 किमीचा पायी प्रवास करत असून नागरिकांशी संवाद साधत आम्ही आतापर्यंत 500 किमीचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. आपल्या नजरेत आमचा हा संघर्ष लहान असला तरी ज्या मागण्यांसाठी आम्ही संघर्ष करत आहोत, त्या मागण्या अत्यंत महत्त्वाच्या असून लाखो युवांच्या भविष्याशी निगडित आहेत. आणि याच मागण्यांसाठी भविष्यात मोठ्या संघर्षाची देखील आमची तयारी आहे.”

हेही वाचा >> पोलिसांनी ईडी अधिकाऱ्याला केली अटक, 8 किमी पाठलाग करून आवळल्या मुसक्या

“युवांच्या, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना घेऊन चाललेल्या युवा संघर्ष यात्रेकडे राजकीय टीकेसाठी का होईना आपले लक्ष गेलेच आहे, तर युवकांचे जे मुद्दे आम्ही घेऊन चाललो आहोत त्यांच्याकडेही थोडे लक्ष द्या. आपण माझ्यावर काहीही टीका करा, टीका मी पचवून घेईन परंतु युवांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर अजिबात खपवून घेणार नाही.”

ADVERTISEMENT

हेही वाचा >> “अजित पवार-प्रफुल पटेल म्हणाले, ‘पाहिजे ते मंत्रिपद देतो”

“तुमची कार्यक्षमता आणि तळमळ महाराष्ट्राने याआधीही पाहिली आहे,भाजपसोबत गेलात म्हणून ती कार्यक्षमता आणि तळमळ कमी झाली असल्याच्या चर्चा असल्या तरी युवांचे प्रश्न मार्गी लावून आपली खरी ताकद पुन्हा एकदा दाखवून द्या.”

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT