Rule Change : 1 डिसेंबरपासून ‘हे’ नियम बदलले, सर्वसामान्यांच्या खिशावर काय होणार परिणाम ?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

rule change from 1st december 2023 lpg cylinder price ipo bank rule bank holiday
rule change from 1st december 2023 lpg cylinder price ipo bank rule bank holiday
social share
google news

Rule change From 1st December 2023 : आज 1 तारखेपासून डिसेंबर महिना सुरु झाला आहे. या डिसेंबर महिन्यात अनेक नियमात बदल करण्यात आले आहेत. जसे गॅसच्या दरात वाढ झाली आहे, आयपीओचे नियम बदललेत, सिमकार्ड खरेदीसाठी आता नवीन प्रणाली समोर आली आहे. या बदलाचा सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात नेमक्या कोणत्या महत्वपुर्ण गोष्टींचे नियम बदलणार आहेत, हे जाणून घेऊयात. (rule change from 1st december 2023 lpg cylinder price ipo bank rule bank holiday)

ADVERTISEMENT

एलपीजी गॅस दरात वाढ

तेलाच्या कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजीच्या किंमतीत बदल करतात. त्यानुसार 1 डिसेंबर 2023 पासून गॅसच्या दरात मोठा बदल करण्यात आला आहे. राजधानी दिल्लीपासून मुंबईपर्यंत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 41 रुपयांनी वाढ झाली आहे. तर ऑगस्ट महिन्यापासून देशात 14 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमती स्थिर आहेत.

हे ही वाचा : NCP : ‘शरद पवारांना पंतप्रधान पदाची संधी होती, पण…’, प्रफुल पटेलांचा मोठा गौप्यस्फोट

गॅस कितीला मिळणार?

1 डिसेंबरपासून राजधानी दिल्लीत 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 1755.50 रुपयांऐवजी 1796.50 रुपयांना मिळणार आहे. तर कोलकातामध्ये त्याची किंमत 1885.50 रुपयांवरून 1908.00 रुपये करण्यात आली आहे. मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1728.00 रुपयांऐवजी 1749.00 रुपये झाली आहे. तर चेन्नईमध्ये ते 1942.00 रुपयांऐवजी 1968.50 रुपयांना मिळेल.

हे वाचलं का?

IPO च्या नियमात बदल

जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये किंवा IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा नियम तुमच्यासाठी महत्वाचा आहे. सेबीने आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. या नियमानुसार आता तुम्हाला तुमच्या शेअर अलॉटमेंटसाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही.

हे ही वाचा : Exit Poll 2023: लोकसभेची सेमीफायनल, पाहा 5 राज्यांचा Poll of Polls, कोणत्या राज्यात कोणाची सत्ता?

IPO ची लिस्टिंग करण्याची अंतिम मुदत सध्याच्या 6 दिवस (T+6) वरून 3 दिवस (T+3) करण्यात आली आहे. सेबीने 1 सप्टेंबरपासून स्वेच्छेने लागू केले होते. परंतू आता हा नियम 1 डिसेंबर 2023 पासून सर्वांसाठी लागू करण्यात आला आहे. याचाच अर्थ आता सर्व कंपन्यांचे आयपीओ सदस्यत्व घेतल्यानंतर तीन दिवसात लिस्ट होती. सेबीच्या या निर्णयाने गुतंवणूकदारांना दिलासा मिळणार आहे.

ADVERTISEMENT

…तर बँकांना बसणार दंड

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पहिल्या तारखेपासून बँकेत होणाऱ्या बदलांची माहिती दिली आहे. कर्जाचे पूर्ण भरणा केल्यानंतर जर ग्राहकाने गॅरेटीच्या बदल्यात ठेवलेली कागदपत्रे वेळेवर परत केली नाहीत तर बँकांवर दंड आकारण्याची तरतूद सेंट्रल बँकेने केली आहे. हा दंड दरमहा 5000 रुपये निश्चित करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

सिम कार्ड खरेदीसाठी KYC गरजेचे

नवीन सिम खरेदीचे नियम आता बदलण्यात आले आहेत. हे नियम आजपासून लागू होणार आहेत. आता कोणताही दुकानदार पूर्ण केवायसी केल्याशिवाय कोणत्याही ग्राहकाला सिम विकू शकणार नाही. केवायसी व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात सिम खरेदीवरही बंदी घालण्यात आली आहे. नवीन नियमांनुसार आता एका आयडीवर मर्यादित सिम कार्ड जारी करण्याची तरतूद करण्यात आली आहे. नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड आणि तुरुंगवासही होऊ शकतो, असे दूरसंचार विभागाने सांगितले आहे.

18 दिवस बँका बंद

डिसेंबर महिन्यात बँकांना मोठ्या प्रमाणात सुट्ट्या आहेत. त्यामुळे तुमचे बँकेशी संबंधित कोणतेही काम असल्यास सर्वात आधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जारी केलेली बँकेच्या सुट्टीची यादी एकदा तपासा. डिसेंबर महिन्यात 18 दिवस बँका बंद आहेत. या 18 दिवसांमधील 11 दिवस विविध राज्यात असलेल्या सणांमुळे सुट्ट्या आहेत. तर 7 दिवस शनिवार आणि रविवार अशा सुट्ट्या आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT