Samruddhi Mahamarg Accident : ‘समृद्धी’वर पुन्हा अपघात! नाशिकचे 12 भाविक ठार
samruddhi mahamarg accident news today in marathi : समृद्धी महामार्गावर रविवारी (१५ ऑक्टोबर) रात्री झालेल्या अपघातात १२ भाविकांचा मृत्यू झाला. जखमीपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ADVERTISEMENT
Samruddhi Mahamarg accident news today Marathi : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा दुर्घटनेमुळे चर्चेत आला आहे. भाविकांना घेऊन जाणारी खासगी टेम्पो ट्रॅव्हलर गाडी उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. यात 12 भाविकांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेले सर्व जण नाशिक येथील आहेत. (11 Devotees died in accident at vaijapur on mumbai nagpur samruddhi expressway)
ADVERTISEMENT
छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनी टेम्पो ट्रॅव्हलर गाडीत 28 जण होते. अपघातात 12 भाविकांचा जागेवरच मृत्यू झाला. तर उर्वरित भाविक जखमी झाले असून, त्यांच्यावर वैजापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 14 जणांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भाविकांच्या गाडीला समृद्धी महामार्गावर अपघात
हा अपघातात वैजापूर तालुक्यात घडला आहे. समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोलनाक्यासमोर रविवारी (15 ऑक्टोबर) पहाटे दीड वाजता ही घटना घडली. वेगात असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रकची धडक झाली. टेम्पो ट्रॅव्हलरमधून 28 जण प्रवास करत होते. अपघातात 12 जण जागीच ठार झाले.
हे वाचलं का?
हेही वाचा >> MLA Disqualification: ‘2 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश द्यावे लागतील..’, कोर्टाने नार्वेकरांना झापलं!
देवदर्शनानंतर मृत्यूने रस्त्यातच गाठलं
नाशिक येथील (इंद्रानगर) भाविक खासगी ट्रॅव्हलर गाडीने बुलढाणा जिल्ह्यातील बाबा सैलानी येथे दर्शनासाठी गेले होते. परत येत असताना मृत्यूने 12 जणांना वाटेतच गाठलं. भरधाव असलेल्या ट्रकच्या चालकाने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी पाठीमागून जोरात ट्रकवर जाऊन आदळली, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
हेही वाचा >> Manoj Jarange: ‘मराठ्यांनी ‘तसं’ बोलणाऱ्यांच्या मुस्काटात हाणली..’, जरांगे-पाटील असं का म्हणाले?
ADVERTISEMENT
मृत्यू झालेले ते 12 जण कोण?
मृतांची नावे समोर आली असून, तनुश्री सोळसे (वय 5), संगीता अस्वले (वय 40), अंजाबाई जगताप (वय 38), रतन जगधने (वय 45), कांतल सोळसे (वय 32), रजनी तपासे (वय 32), हौसाबाई शिरसाट (वय 70), झुंबर गांगुर्डे (वय 50), अमोल गांगुर्डे (वय 50), सारिका गांगुर्डे (वय 40), मिलिंद पगारे (वय 50), दीपक केकाने (वय 47) यांचा समावेश आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT