Datta Dalvi : दळवींना अटक, राऊतांचा सुटला संयम; शिंदेंना म्हणाले, चाबकाने…

विक्रांत चौहान

ADVERTISEMENT

Datta dalvi arrested by Bhandup police, sanjay raut hits out at Eknath shinde.
Datta dalvi arrested by Bhandup police, sanjay raut hits out at Eknath shinde.
social share
google news

Sanjay Raut Reaction on Datta Dalvi Arrest : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक झाल्यानंतर खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तोफ डागली. एकनाथ शिंदेंचा गद्दार ह्रदयसम्राट असा उल्लेख करत राऊतांनी संताप व्यक्त केला. शिंदेंनी सावरकर आणि बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केला आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा होता, असे राऊतांनी म्हटले आहे. (Sanjay Raut Gets Angry after bhandup police arrested datta dalvi)

दत्ता दळवी यांना २९ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर खासदार संजय राऊत भांडुप पोलीस ठाण्यात गेले. यावेळी माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले,”मुंबईचे माजी महापौर, शिवसेनेचे उपनेते, आमचे सहकारी दत्ता दळवी यांना आज सकाळी पोलिसांनी घरात घुसून अटक केली. एखाद्या ३०२, ३०७ या गुन्ह्यातील जे आरोपी असतात, त्यांना अटक करायला जावी आणि आरोपी पळून जाणार आहे, अशा पद्धतीने पोलिसांचा फौजफाटा त्यांच्या घरात घुसला. त्यांना अटक करून इथे घेऊन आले.”

दत्ता दळवींच्या विधानाबद्दल राऊत काय बोलले?

“दत्ता दळवींचा गुन्हा काय आहे, त्यांनी महाराष्ट्राच्या, जनतेच्या लोकभावना भांडुपमधील एका मेळाव्यात व्यक्त केल्या. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी किंवा त्यांच्यासोबत जे गद्दार ह्रदयसम्राट आहेत. ते स्वतःला हिंदुह्रदयसम्राट म्हणून घेताहेत. त्यावर जनतेचा आक्षेप आहे”, अशी भूमिका संजय राऊतांनी मांडली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ठाकरेंच्या नेत्याला घरातून अटक, शिंदेंवर काय केली होती टीका?

“गद्दार ह्रदयसम्राटाने स्वतःला हिंदुह्रदयसम्राट म्हणवून घेणे हा वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे. त्याबद्दल खरंतर एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल व्हायला हवा होता. मी मुख्यमंत्र्यांबद्दल बोलत नाही. दत्ता दळवींनी शिवसैनिक म्हणून जोशपूर्ण भाषण केले. ते असे म्हणाले की, आनंद दिघे असते, तर या गद्दार ह्रदयसम्राटाला चाबकाने फोडून काढलं असते. यात चुकीचे काय चुकीचे बोलले”, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.

हेही वाचा >> MLA Disqualification Case : 2019 चा ठराव, उद्धव ठाकरेंचा अधिकारच धोक्यात! सुनावणीत काय झालं?

“त्यांनी एक शब्द वापरला, ते म्हणाले #@$ चे. हा शब्द धर्मवीर चित्रपटामध्ये आनंद दिघेंच्या तोंडी घातलेला आहे. तो सेन्सॉर बोर्डाने काढला नाही. जर तो शब्द आक्षेपार्ह असेल, तर चित्रपटाचे निर्माते, चित्रपटाचे प्रायोजक, चित्रपटातील कलाकार यांच्यावर सरकारने गुन्हा दाखल केला का? मग तो शब्द दत्ता दळवींनी वापरला, तर त्यांना अटक कशी केली जाते?”, असा प्रश्न राऊतांनी दळवींच्या अटकेनंतर उपस्थित केला.

ADVERTISEMENT

“नारायण राणेवर गुन्हा दाखल केला का?”

नारायण राणेंचा उल्लेख करत राऊतांनी सरकारवर निशाणा साधला. “काही दिवसांपूर्वी इथे नारायण तातू राणे आला होता. त्याने गाढव नाक्याला माझ्यावर भाषण केलं. शिव्या घातल्या. गुन्हा दाखल केला का? तो अब्दुल सत्तार एक मंत्री आहे, सुप्रिया सुळेंना घाणेरड्या शब्दात शिवीगाळ केली, गुन्हा दाखल केला का? असे अनेक भाजप-शिंदे गटाचे लोक शिव्या घालताहेत, पण त्यांच्यावर गुन्हा नाही”, असे राऊत यांनी म्हटले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT