Shiv Sena: ‘बाप चोरणारे.. जे गुवाहटी, सूरतला पळून गेले त्यांनी..’, राड्यानंतर आदित्य ठाकरे संतापले
Shiv Sena Aaditya Thackeray: शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळासमोर शिंदे गट आणि ठाकरे गटात झालेल्या राड्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रचंड संताप व्यक्त करत शिंदे गटावर जहरी टीका केली आहे.
ADVERTISEMENT
Aaditya Thackeray Angry: मुंबई: दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला स्मृतीस्थळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आदरांजली वाहिली. पण मुख्यमंत्री शिंदे माघारी परतल्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळासमोरच ठाकरे गट आणि शिंदे गटात मोठा राडा झाला. यावेळी पोलिसांच्या समोरच दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी देखील झाली. ज्यानंतर शिवसेना (UBT)चे आमदार आदित्य ठाकरे यांनी या राड्याबाबत प्रचंड संताप व्यक्त करत शिंदे गटावर तुफान टीका केली. (clash between workers of shinde group and thackeray group in front of balasaheb memorial aaditya thackeray got angry criticism on shinde group)
ADVERTISEMENT
‘जे घाबरले आहेत.. जे बाप चोरणारे, पक्ष चोरणारे आहेत.. जे गुवाहटी आणि सूरतला पळून गेले त्यांना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचं काही अधिकार नाही.’ अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली आहे.
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळासमोर राडा, आदित्य ठाकरे संतापले
‘जे घाबरले आहेत.. जे बाप चोरणारे, पक्ष चोरणारे आहेत.. जे गुवाहटी आणि सूरतला पळून गेले त्यांना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचं काही अधिकार नाही. खरं तर आपण पाहताय की, पहिले बाळासाहेबांचा फोटो वापरून नंतर नाव, पक्ष वापरून वैगरे स्वत:साठी राजकारण केलं.
‘मी पहिल्यापासून बोलतोय.. अजून नवी मुंबई मेट्रोचं उद्घाटन झालं नाही. पाच महिने नवी मुंबई मेट्रो जशीच्या तशी आहे. कुठेही जनतेकडे लक्ष नाही.. स्वत:च्या पक्षासाठी राज्याबाहेर प्रचार करायला यांना वेळ आहे. पण महाराष्ट्रात आल्यानंतर वातावरण बिघडवायचं, दंगली घडवायच्या, उद्योग गुजरातला पाठवून द्यायचे.. हे सगळं वातावरण मिंधे सरकारच्या नावाखाली चालू आहे.’
हे वाचलं का?
हे ही वाचा>> Shiv Sena: ‘या’ एका घटनेनंतर तुफान राडा.. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर काय घडलं?
‘मला वाटतं ज्यांना-ज्यांना वाटलं की, जे डरपोक आणि गद्दार लोकं तिथे येऊ नये त्यांनी तिथे घोषणा दिल्या असतील. त्यात चुकीचं काय?’
‘मुंब्र्यात आपण पाहिलं असेल की, वांद्रेमध्ये देखील पाहिलं असेल की, ज्या पक्षाने, ज्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो होता तिथे हतोडा, ती शाखा तोडणं, बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा मारणं.. हे कॅमेऱ्यात टिपलं गेलं आहे.. त्यामुळे त्यांना काय अधिकार आहे स्मृतीस्थळावर जाण्याचा..’
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Sharad Pawar ‘आपण सत्तेत नसलो तरी सगळीकडे..’ शरद पवारांची नवी गुगली
‘मला वाटतं महाराष्ट्रच त्यांना दणक्यात उत्तर देणार आहे.. निवडणुका लावू दे.. हिंमत नाही त्यांच्यात लावण्याची.. निवडणुका लावल्या तर उत्तर मिळेल त्यांना.’ असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला थेट आव्हानच दिलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT