Kheda : धक्कादायक! गुजरातमध्ये शिव यात्रेवर दगडफेक, 3 पोलीस गंभीर
Shiv ytara गुजरातमधील ठासरामध्ये शिव यात्रेवर दगडफेक झाल्यानंतर तेथील वातावरणात ताणतणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी सुरक्षा वाढवली असून पोलिसांवरही दगडफेक केल्याने 6 पोलीस गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. दगडफेक करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
ADVERTISEMENT
Shiv Yatra : गुजरातमधील खेडा जिल्ह्यात शिव यात्रेबाबत एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. या यात्रेवर दगडफेक (stone pelting)करण्यात आल्याने परिसरात ताणतणाव निर्माण झाला आहे. ठासरा (Thasara) येथे झालेल्या या दगडफेकीनंतर दोन गटांमध्ये वाद निर्माण झाल्याने परिस्थितीमध्ये ताण वढला होता. त्यानंतर पोलिसांनी थेट कारवाई करत वेगवेगळ्या भागात छापा टाकून दगडफेक करणाऱ्या 6 जणांवर कारवाई करत 15 जणांना अटक करण्यात आली आहे. या दगडफेकीमध्ये 3 पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. (shiv yatra kheda gujarat polic stone pelting policemen injured 15 arrested)
ADVERTISEMENT
पोलिसांनी गस्त वाढवली
शिव यात्रेवर ठासरामध्ये दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी या परिसरात कडक बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. परिसरातील प्रत्येक भागात पोलीस वाढवण्यात आल्याने परिसराला पोलीस छावणीचे रुप प्राप्त झाले आहे. पोलिसांनी संवेदनशील भागात फ्लॅग मार्चही काढला. त्याच बरोबर पोलिसांनी गस्त वाढवून या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का त्याची तपासणी सुरु केली आहे. ठासरामध्ये दगडफेक झाल्यानंतर तीन पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. तर नागरिकही जखमी झाले आहेत. त्यामुळे जखमींना रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.
हे ही वाचा >> Eknath Khadse: ‘देवेंद्र फडणवीसांनी वैयक्तिक छळ केला’, खडसेंचा खळबळजनक आरोप
दगडफेकीचे कारण काय?
शिव यात्रेवर दगडफेक का करण्यात आली, त्यांना कुणी प्रवृत्त केले याचा शोधही पोलीस घेत आहेत. पोलिसांनी परिसरात सुरक्षा वाढवल्याने आता परिसरात शांततेचे वातावरण आहे.
हे वाचलं का?
दगडफेक आणि चेंगराचेंगरी
दगडफेक झाल्यानंतर या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. त्यामध्ये एक समुदाय धार्मिक स्थळावर उभा राहून दगडफेक करत आहे. त्यानंतर दोन्ही बाजूंनीही दगडफेक सुरु करण्यात आली. दोन्ही बाजूने दगडफेक झाल्यामुळे परिसरात दगडांचा खच पडला होता. तर गल्ली अरुंद असल्यामुळे दगडफेक झाल्यानंतर नागरिकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चेंगराचेंगरी झाल्याने नागरिकांच्या चप्पलही रस्त्यावर पडून होते.
या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असून परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचेही काम सुरु केले आहे. या प्रकरणात जे जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा >> Imtiyaz Jaleel: मंत्र्यांनी संभाजीनगरात फिरुन दाखवावं, जलीलांचा सरकारला इशारा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT