हनिमूनच्या पहिल्या रात्रीच नवऱ्याला फुटला घाम; धावत-धावत वडिलांकडे आला, “माझी बायको...”
मध्यप्रदेशातील राजगढमध्ये लग्नाच्या दिवशी नवरीकडून नवऱ्याला एक असं सरप्राइज मिळालं, ज्यामुळे त्याला आश्चर्याचा धक्काच बसला आणि अक्षरश: घाम फुटला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरीकडून नवऱ्याला मिळालं सरप्राइज

हनिमूनच्या पहिल्या रात्री नवऱ्याला फुटला घाम

हनिमूनच्या त्या रात्री नेमकं काय घडलं?
MP News: मध्यप्रदेशातील राजगढमधून सर्वांना चकित करुन टाकणारी बातमी समोर आली आहे. एका सामान्य कुटुंबातील तरुणाचं मोठ्या धुमधडाक्यात लग्न झालं. मात्र लग्नाच्या पहिल्या रात्रीच त्याला एक असं सरप्राइज मिळालं, ज्यामुळे त्याला आश्चर्याचा धक्काच बसला आणि अक्षरश: घाम फुटला. असं सरप्राइज मिळाल्यानंतर तो धावत वडिलांकडे गेला आणि म्हणाला, “पप्पा... आपण तर लुटलो”. नवरदेवाला नेमका कोणता आश्चर्याचा धक्का बसला? सविस्तर जाणून घ्या.
लग्नासाठी 2 लाखांची मागणी
बंकपुरा गावातील रामगोपाल नावाच्या एका तरुणाचं बऱ्याच वर्षांपासून लग्न जमत नव्हतं. त्याचा कुटुंबाला याबाबतीत सतत काळजी वाटायची. त्यावेळी गोकुळ वर्मा नावाचा एक व्यक्ती गावात पोहोचली. त्यावेळी गोकुळने रामगोपालच्या वडिलांना एका मुलीचा फोटो दाखवला आणि त्यांच्या कुटुंबियांना रोमगोपालसाठी ती मुलगी आवडली.
लग्न जुळवताना मुलीचे वडील हरीश यांनी त्या दोघांच्या लग्नासाठी तब्बल 2 लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी रामगोपालच्या वडिलांनी दागिने विकून कशी तरी 2 लाखांची जोडणी केली. त्यानंतर गोकूळ आणि जमनालाल यांनी लग्नाची तारीख ठरवली. ब्यावरा येथील अंजनी लाल मंदिरात लग्न करण्याचं ठरवण्यात आलं.