Subrata Roy : 2 हजारातून उभं केलं कोट्यवधींचं साम्राज्य, चिटफंडमधून कसा उभा केला ‘सहारा समूह’?
subrata roy life story in Marathi : सुब्रतो रॉय यांनी २००० रुपयापासून व्यवसायाची सुरुवात केली आणि काही काळातच ते देशातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पोहोचले. सुब्रतो रॉय यांचा जीवन प्रवास कसा होता? वाचा…
ADVERTISEMENT
Story of Subrata Roy Sahara : सहारा ग्रुपचे (Sahara India Pariwar) प्रमुख सुब्रत रॉय (Subrata Roy) यांचे मंगळवारी (14 नोव्हेंबर) रात्री उशिरा निधन झाले. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. रॉय यांच्या निधनानंतर त्यांच्या संघर्षांच्या कहाणीची आणि त्यांनी २ हजारातून उभ्या केलेल्या सहारा समूहाची पुन्हा एकदा चर्चा होतेय. सुब्रतो रॉय नेमके कोण होते आणि त्यांनी सहारा इंडिया कशी उभी केली, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. (Story of Subrata Roy Sahara)
ADVERTISEMENT
1948 मध्ये बिहारच्या अररिया जिल्ह्यात जन्मलेल्या सहारा समूहाचे संस्थापक सुब्रतो रॉय यांचे उत्तर प्रदेशातील गोरखपूरशी घट्ट नाते आहे. त्यांनी शिक्षण आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टी येथूनच सुरू केल्या. त्यानंतर अवघ्या 2000 रुपयांपासून सुरू झालेल्या फायनान्स कंपनीचा व्यवसाय त्यांनी काही काळातच 2 लाख कोटींवर नेला. एक काळ असा होता जेव्हा सुब्रतो रॉय गोरखपूरच्या बेट्टीहाटा येथे एका वकिलाच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होते. इथेच त्यांच्या मुलांचा जन्म झाला.
‘सहारा श्री’ सुब्रतो रॉय यांनी वित्त, रिअल इस्टेट, मीडिया आणि हॉस्पिटॅलिटी, इतर क्षेत्रांसह एक विशाल साम्राज्य उभं केलं. 1978 मध्ये त्यांनी ‘सहारा इंडिया परिवार’ ग्रुपची स्थापना केली. रॉय यांना गोरखपूरबद्दल खूप आपुलकी होती. त्यामुळे त्यांनी मीडिया क्षेत्र असो किंवा रिअल इस्टेट, त्यांच्या कंपनीने गोरखपूरमध्ये मोठी गुंतवणूक केली. 2000 मध्ये रॉय यांच्या निमंत्रणावरून अमिताभ बच्चनसारखे दिग्गज सिनेकलाकार गोरखपूरला गेले होते.
हे वाचलं का?
भाड्याची खोली आणि स्कूटरवरून वाढवला व्यवसाय
सुब्रतो रॉय यांनी 1978 मध्ये त्यांचे मित्र एसके नाथ यांच्यासोबत गोरखपूरमध्ये फायनान्स कंपनी सुरू केली. जिचं ऑफिस सिनेमा रोडवर होतं. सुरुवातीला हे भाड्याने घेतलेले कार्यालय एका खोलीचे होते, त्यात दोन खुर्च्या होत्या. जिथे रॉय त्याच्या स्कूटरवर यायचे.
या फायनान्स कंपनीच्या माध्यमातून सुब्रतो रॉय छोट्या दुकानदारांकडून बचत करून घ्यायचे. काही काळानंतर भांडवल थोडे वाढल्यावर त्यांनी कपड्यांचा आणि पंख्यांचा छोटा कारखानाही सुरू केला. स्थानिक लोक सांगतात की, या काळात ते त्याच्या स्कूटरवरून पंखे आणि इतर वस्तू विकायचे. ते स्वतः दुकानामध्ये जायचे आणि पंखे पोहोचवायचे. त्याचबरोबर दुकानदारांना अल्पबचतीबद्दल अर्थसाक्षर करायचे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या मृत्यूचे कारण काय?
हळुहळु त्याच्या बोलण्याचा प्रभाव पडत गेला. लोक त्यांच्याशी जोडले जात होते. विशेषतः मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय लोक. बँकिंग गरजा आणि रोजगाराच्या संधींमध्ये सुब्रतो रॉय यांची योजना यशस्वी होऊ लागली. मात्र, याच दरम्यान 1983-84 मध्ये रॉय यांचे व्यावसायिक मित्र एसके नाथ यांनी वेगळे होऊन दुसरी कंपनी स्थापन केली. त्यानंतर रॉय यांनी लखनऊमध्ये त्यांच्या कंपनीचे मुख्यालय उघडले आणि मागे वळून पाहिले नाही.
ADVERTISEMENT
टाइम मॅगझिनने घेतली दखल, लोणावळ्यात उभारली अॅम्बी व्हॅली
गोरखपूरमधून सुरुवात केलेल्या सुब्रतो रॉय यांनी मोठी उंची गाठली हे विशेष. रॉय यांनी 1970 च्या दशकाच्या उत्तरार्धात चिट फंड व्यवसाय सुरू केला आणि वेगाने एक साम्राज्य निर्माण केले ज्यामध्ये एअरलाइन्स, टेलिव्हिजन चॅनेल आणि रिअल इस्टेटचा समावेश होता.
रॉय यांच्या सहारा इंडिया परिवाराला ‘टाइम मॅगझिन’ने रेल्वेनंतर भारतातील दुसरे सर्वात मोठे नियोक्ता (रोजगार देणारा उद्योग समूह) म्हणून गौरवले होते, सुमारे 12 लाख कर्मचारी सहारा समूहात कार्यरत होते.
हे ही वाचा >> CM शिंदेंनी कीर्तिकरांना काय दिली होती ऑफर? रामदास कदमांनी सांगून टाकलं
रिअल इस्टेटबद्दल बोलायचे, तर त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अॅम्बी व्हॅली सिटी हा देखील होता, जो महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळ आहे. याशिवाय रॉय यांनी 1993 मध्ये एअर सहारा सुरू केली होती, जी त्यांनी नंतर जेट एअरवेजला विकली. सहारा ग्रुप 2001 ते 2013 पर्यंत टीम इंडियाचा प्रायोजकही होता. त्याचवेळी सहाराची टीम ‘पुणे वॉरियर्स’ने 2011 मध्ये आयपीएलमध्ये खेळली होती.
मुलांचे लग्न ठरले चर्चेचा विषय
2004 मध्ये झालेल्या सुब्रतो रॉय यांच्या दोन मुलांचा विवाह एका आठवड्यापेक्षा जास्त काळ चालला होता. शतकातील सर्वाधिक चर्चेत असलेले भारतीय लग्न असे या लग्नाचे वर्णन केले गेले. या विवाह सोहळ्याला सुमारे 10 हजार लोक उपस्थित होते. ज्यामध्ये मोठं मोठे उद्योगपती, व्यावसायिक, बॉलिवूड स्टार्स, क्रिकेट आणि फॅशन जगतातील दिग्गज विवाह सोहळ्यासाठी आले होते. या पाहुण्यांना विशेष विमानाने लखनौला नेण्यात आले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT