कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात येणार पैसा, सरकारने सुरू केले वाटप
onion farmers : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या अनुदानाचे वितरण सुरू… तीन लाख शेतकऱ्यांना 300 कोटी रुपये अनुदान वितरित होणार.
ADVERTISEMENT

Maharashtra Government : राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या अनुदान वितरणाच्या पहिल्या टप्याचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
बुधवारी (6 सप्टेंबर) मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पणन मंत्री अब्दुल सत्तार विखे पाटील यांनी कांदा अनुदान वितरणाचा ऑनलाइन शुभारंभ केला.
पहिल्या टप्प्यात 3 लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 300 कोटी एवढा निधी ऑनलाइन पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित होणार आहे. उर्वरित अनुदान वितरणासाठी दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना लाभ
कांदा अनुदानासाठी 10 कोटी पेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेल्या नागपूर, रायगड, सांगली, सातारा, ठाणे, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, लातूर, यवतमाळ, अकोला, वाशिम या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरित होणार आहे.