‘सुप्रिया सुळेंनी मांसाहार करून मंदिरात घेतली सभा’, फोटो दाखवत भाजपचा आरोप
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर भाजपने गंभीर आरोप केला आहे. सुप्रिया सुळे यांनी मांसाहार केला आणि नंतर मंदिरात सभा घेतली असं भाजपचं म्हणणं आहे.
ADVERTISEMENT
Supriya Sule News : बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर याच वर्षी मार्च महिन्यामध्ये एक आरोप झाला होता. आरोप करणारे नेते होते शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे आणि त्यांनी आरोप केला होता, मांसाहार करून देवदर्शन केल्याचा. आता तसाच आरोप सुप्रिया सुळे यांच्यावर भाजपकडून करण्यात आला आहे. काही फोटो दाखवत भाजपकडून खासदार सुळेंनी मांसाहार करून विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सभा घेतल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय आणि सुप्रिया सुळेंनी यावर काय म्हटलंय… तेच समजून घेऊयात.
ADVERTISEMENT
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पवार कुटुंबातील सदस्य आस्तिक आहेत की नास्तिक, हा मुद्दा बऱ्याचदा चर्चेत आला आणि येतो. पण, खासदार सुप्रिया सुळेंचा इंदापूर दौरा वेगळ्या कारणामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुकमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी मांसाहार करून विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सभा घेतल्याचा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष अॅड. शरद जामदार यांनी केला आहे.
भाजपचा नेमका आरोप काय?
खासदार सुप्रिया सुळे गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करीत आहेत. गुरुवारी (18 मे) त्या इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक गावात भेटीसाठी आल्या होत्या. यावेळी एका कार्यकर्त्याच्या घरी त्यांनी जेवण केले आणि त्यानंतर गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सभा घेतली.
हे वाचलं का?
हेही वाचा >> MVAचा जागा वाटपाचा तिढा सुटला? नाना पटोलेंनी ‘मुंबई Tak’वर सांगितला फॉर्म्युला
त्यावरूनच सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. सुळे यांनी जेवणात मांसाहार केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. यासंदर्भातील काही फोटो भाजपकडून दाखवण्यात आले आहेत. सुप्रिया सुळे मांसाहार करून मंदिरात गेल्या आणि त्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या, असं भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद जामदार यांचं म्हणणं आहे.
या प्रकारानंतर गावातील कार्यकर्त्यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात गोमूत्र शिंपडून परिसर स्वच्छ धुऊन काढला, असंही ते म्हणाले.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> जयंत पाटलांचं कौतूक, ठाकरेंनी सगळा इतिहासच काढला! ‘सामना’तून पुन्हा ‘वार’
‘सुप्रिया सुळे यांनी अनेकदा हिंदू धर्मियांच्या अशा पद्धतीने भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांनी आत्मक्लेष करून या प्रकाराची माफी मागावी, अन्यथा त्यांना तालुक्यात फिरू देणार नाही’, असा इशाराही जामदार यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
खासदार सुप्रिया सुळे यांना याबाबत विचारले असता, त्यांनी हा आरोप फेटाळून लावला. ‘आपण त्यादिवशी मांसाहार केलाच नव्हता. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे न्याय मागणार आहे. मी एक महिला खासदार असताना माझ्या खाण्यापिण्याकडे इंदापूर आणि पुरंदर तालुक्यातील काही पुरुष लक्ष ठेवत असतात. त्यामुळे माझ्या सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधितांना अटक करावी आणि मला संरक्षण द्यावे, अशी मागणी अमित शाह यांच्याकडे करणार आहे”, असं सुप्रिया सुळे या आरोपांवर बोलताना म्हणाल्या.
विजय शिवतारेंनीही केला होता आरोप
मार्च 2023 मध्ये माजी आमदार विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळे मांसाहार करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या फेसबुक पेजवरील देवदर्शनाचे फोटोही शेअर केले होते. ‘आधी मटण खाल्लं. मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मग महादेव मंदिरात गेल्या. मग दिवे घाट ओलांडून सासवडला गेल्या. सासवडला संत सोपानकाकांचे दर्शन घेतले. येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला||’, अशी टीका शिवतारे यांनी केली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT