Pope Francis Death: वयाच्या 88 व्या वर्षी पोप फ्रान्सिस यांनी घेतला अखेरचा श्वास; प्रदीर्घ आजाराने निधन
ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. त्यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

वयाच्या 88 व्या वर्षी पोप फ्रान्सिस यांचे निधन

पोप फ्रान्सिस यांच्या निधनाचं कारण
Pope Francis death: ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. त्यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. व्हॅटिकनकडून मिळालेल्या माहितीनुसार, ते बऱ्याच वर्षांपासून आजाराचा सामना करत होते.
व्हॅटिकनने सोमवारीच एक निवेदन जारी केले आणि त्यात पोप फ्रान्सिस हे रोमन कॅथोलिक चर्चचे पहिले लॅटिन अमेरिकन धर्मगुरू होते, असं सांगितलं गेलं. त्यांच्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये न्यूमोनिया असल्याचं वृत्त समोर आलं आणि यामुळेच त्यांची प्रकृती चिंताजनक राहिली. ते बराच काळ रुग्णालयात दाखल होते. 38 दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांचे निधन त्यांच्या कासा सांता मार्टा (Casa Santa Marta) येथील निवासस्थानी झाले.
पोप फ्रान्सिस यांनी ईस्टर रविवारचं औचित्य साधून अचानक सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती लावली होती. त्यांनी सेंट पीटर्स स्क्वेअरमधील 35000 लोकांच्या गर्दीमधील लोकांसोबत हस्तांदोलन करून अभिवादन स्वीकारले. व्हॅटिकन कार्डिनल केविन फॅरेल यांच्या मते, पोप फ्रान्सिस यांचे संपूर्ण आयुष्य देवाच्या सेवेसाठी समर्पित होते.
हे ही वाचा: वयाच्या 61 व्या वर्षी भाजपचा 'हा' नेता करणार लग्न; कोणासोबत बांधणार लग्नगाठ, थक्क करणारी Love Story