रोडरोमियोंना अद्दल! पोलिसांनी अशी दिली शिक्षा, मुलींची छेडछाड आली अंगलट

ADVERTISEMENT

viral video up police punished those molested the girls video went viral
viral video up police punished those molested the girls video went viral
social share
google news

Viral Viral: सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ बघून अनेक जणांना हसू आवरता येत नाही. हा व्हिडीओ बघणारे अनेक जण जशी करणी तशी भरणी अशीच प्रतिक्रियाही व्यक्त केली जात आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर असंही सांगितल जात आहे की, हा व्हिडीओ उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनऊच्या रामलीला (Ramlila) यात्रेतील असल्याचे सांगितले जाते आहे.(viral video up police punished those molested the girls video went viral)

छेडछाड मुलींची

रामलीला यात्रेत काही खोडकर मुलं हुल्लडबाज करताना दिसत होती. यात्रेत आलेल्या मुलींच्या पाठीमागून फिरत त्यांच्या जवळ जात मोठ मोठ्याने हॉर्न वाजवण्याची मस्त ही मुलं करत होती. मुलांनी वाजवलेल्या कर्ण कर्कश आवाजामुळे मुलीही घाबरत होत्या.

हे ही वाचा >>Alibaug Crime : आईवर कोयत्याने वार, अंगणात जिवंत जाळलं; उच्चशिक्षित तरूणाचं राक्षसी कृत्य

भर यात्रेतच कारवाई

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी थेट कारवाई करत रोडरोमियोंना शोधून काढून त्यांना अद्दल घडवली आहे. यात्रेत मस्ती करत आणि मुलींची छेडछाड काढत फिरणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडून जो हॉर्न मुलींच्या कानात वाजवला जात होता. तोच हॉर्न घेऊन त्या मुलांना एकमेकांच्या कानात वाजवला सांगितला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कान धरून उठाबशा

पोलीस म्हणाले की, त्या मुलांनाही कानात हॉर्न वाजवल्यामुळे नेमका काय त्रास होतो हे त्यांना समजण्यासाठी ही अद्दल त्या मुलांना घडवली असल्याचेही पोलिसांनी सांगितले. त्यानंतर यात्रेमध्येच पोलिसांनी कान धरुन त्यांना उठाबशा काढायलाही सांगितल्या. त्यामुळे हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हे ही वाचा >> Manoj Jarange : ‘जरांगेला अटक करा, मुसक्या…’, सदावर्ते फडणवीसांचं नाव घेऊन काय बोलले?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT