Parag Desai Dies: धक्कदायक! Wagh Bakri चहा मालकाचा मृत्यू, भटक्या कुत्र्यांनी घेतला जीव

रोहित गोळे

ADVERTISEMENT

wagh bakri tea owner parag desai was attacked by a street dog died at the age of 49
wagh bakri tea owner parag desai was attacked by a street dog died at the age of 49
social share
google news

Parag Desai Passes Away: वाघ बकरी चहा (Wagh Bakri Tea) आज देशातील आघाडीच्या चहा कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीसाठी आणि उद्योगासाठी एक वाईट बातमी आहे. वाघ बकरी चहा समूहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई (Parag Desai) यांचे अचानक निधन (Death) झाले. ते अवघ्या 49 वर्षांचे होते. (wagh bakri tea owner parag desai was attacked by a street dog died at the age of 49)

वास्तविक, 15 ऑक्टोबर रोजी पराग देसाई यांना अपघातात ब्रेन हॅमरेज झाला होता. कुटुंबातील जवळचा मित्र आणि कंपनीचे मार्केटिंग हेड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पराग देसाई हे 15 ऑक्टोबरला संध्याकाळी घराजवळ फिरायला गेले होते. संध्याकाळी काही कुत्रे त्यांच्यावर भुंकायला लागले. कुत्र्याच्या हल्ल्यापासून स्वतःला वाचवत असताना ते घसरले आणि जमिनीवर पडले, त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

डोक्याला गंभीर दुखापत

रिपोर्टनुसार, इस्कॉन अम्बली रोडवर पायी जात असताना कुत्र्याच्या हल्ल्यात पराग देसाई जखमी झाले. त्यांना तात्काळ शेल्बी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यानंतर त्यांना शस्त्रक्रियेसाठी झायडस रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. रविवारी 22 ऑक्टोबर रोजी त्यांचे निधन झाले. ब्रेन हॅमरेजमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पराग देसाई यांचे वडील रसेस देसाई हे सध्या वाघ बकरी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. वाघ बकरी चहा कंपनीत पराग हे विक्री, मार्केटिंग आणि निर्यात या गोष्टी पाहत होते. पराग देसाई यांनी न्यूयॉर्कमधील लॉन आयलँड विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण घेतले होते. पराग देसाई यांच्या कुटुंबातील सदस्य चार पिढ्यांपासून चहाच्या व्यवसायात आहेत.

हे ही वाचा >> Crime : 22 दिवसांनी होते तरुणीचे लग्न, मित्रासोबत हॉटेलमध्ये थांबली अन्…

पराग देसाई यांच्या नेतृत्वाखाली कंपनी अनेकदा मोठं यश मिळवलं असल्याने त्यांची कंपनी देखील बाजारात यशस्वी ठरत होती. व्यवसायासोबतच पराग देसाई यांना वन्यप्राण्यांबद्दलही प्रचंड आवड होती.

ADVERTISEMENT

पराग देसाई 1995 मध्ये वाघ बकरी चहासोबत जोडले गेले होते. त्यावेळी कंपनीची एकूण उलाढाल 100 कोटी रुपयांपेक्षा कमी होती. पण आज याच कंपनीची वार्षिक उलाढाल ही 2000 कोटींच्या पुढे गेली आहे. वाघ बकरी चहा भारतातील 24 राज्यांसह जगातील 60 देशांमध्ये निर्यात केला जातो. ही देसाईंची योजना होती, ज्यामुळे कंपनीचे ब्रँडिंग मजबूत झाले. ब्रँडच्या अनोख्या नावामुळे लोकही या उत्पादनाशी जोडले गेले.

ADVERTISEMENT

वाघ-बकरी चहाची सुरुवात कशी झाली?

वाघ-बकरी चहाचे नाव कसे पडले? यामागे सामाजिक अन्यायाविरुद्ध लढण्याचा इतिहास आहे. एका लेखानुसार वाघ आणि बकरी हे प्रतीक एकता आणि सुसंवादाचे आहे असं दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या चिन्हात वाघ म्हणजे उच्च वर्गातील लोक आणि बकरी म्हणजे निम्न वर्गातील लोक. दोघांना एकत्र चहा पिताना दाखवणे हा लोकांसाठी मोठा संदेश होता.

हे ही वाचा >> “अख्खे कुटुंब याच वावरात पुरेन”, भाजप आमदार सुरेश धसांच्या पत्नीसह तिघांविरुद्ध गुन्हा

संपूर्ण गुजरातमध्ये यश संपादन केल्यानंतर, कंपनीने पुढील काही वर्षांत देशभर विस्तार करण्यास सुरुवात केली. 2003 ते 2009 दरम्यान, ब्रँडचा विस्तार महाराष्ट्र, राजस्थान, यूपी यासारख्या अनेक राज्यांमध्ये झाला. आज ते संपूर्ण भारतात घराघरात पोहचले आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT