'इवांकाची फिगर चांगली, माझी मुलगी नसती तर...', ट्रम्प यांचं ते विधान तुफान व्हायरल..

मुंबई तक

Donald Trump Viral Video:अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची जोरदार चर्चा होत आहे. अशा परिस्थितीत डोनाल्ड ट्रम्प यांची जीवनशैली, त्यांची कारकीर्द, त्यांची भाषणे यावर बरीच चर्चा होत आहे.

ADVERTISEMENT

ट्रम्प यांचं ते विधान तुफान व्हायरल..
ट्रम्प यांचं ते विधान तुफान व्हायरल..
social share
google news

US President Donald Trump on Ivanka Trump: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची जगभरात जोरदार चर्चा होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीबद्दल आणि त्यांच्या खास शैलीबद्दल इंटरनेटवर चर्चा आहे. डोनाल्ड ट्रम्प अनेकदा आपल्या भावना व्यक्त करताना अजिबात मागचा पुढचा विचार करत नाहीत आणि त्यांच्या विनोदी विधानांमुळे ते चर्चेतही राहतात. अनेकवेळा त्यांनी त्यांची मुलगी इवांका ट्रम्पबद्दल देखीलं अशी काही विधानं केली आहेत की, ज्यामुळे ते चर्चेत आले आहेत. आता निवडणूक जिंकल्यानंतर पुन्हा एकदा त्यांची एक मुलाखत व्हायरल होत आहे. ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी मुलगी इवांकाबद्दल एक बोल्ड विधान केलेलं 

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ही घटना 1997 मध्ये घडली होती, जेव्हा इवांका ट्रम्प 16 वर्षांची होती आणि मिस टीन यूएसए स्पर्धेचे आयोजन करत होती. त्यावेळी या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प यांनी उपस्थित मिस युनिव्हर्सला विचारले होते की, 'माझी मुलगी हॉट आहे असे तुम्हाला वाटत नाही का? ती हॉट आहे, नाही का?'

हे ही वाचा>> Oshin Sharma: 'ती' गोष्ट घडली अन् उपजिल्हाधिकारी मॅडमचा करेक्ट कार्यक्रम...

गेल्या निवडणुकीत इवांका तिचे वडील डोनाल्ड ट्रम्प यांची सल्लागार होती आणि निवडणूक प्रचारात त्यांच्यासोबत होती. त्यावेळी इवांका म्हणाली होती की, 'माझे वडील आपल्या सर्वांसाठी दररोज कठोर संघर्ष करतात.'

त्याचप्रमाणे, हॉवर्ड स्टर्न शोवर एका मुलाखतीदरम्यान, ट्रम्प यांनी आपली मुलगी इवांकासाठी Voluptuous हा शब्द वापरला, ज्याचा अर्थ आकर्षक, कामुक इत्यादी आहे आणि तिचे वर्णन एक अद्भुत मुलगी म्हणून केलेले. यानंतर, त्यांनी पुन्हा इवांकाचे कौतुक केले आणि सांगितले की इवांका जगातील महान सुंदरींपैकी एक आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp