DRDO: पाक ललनेच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकलेला प्रदीप कुरूळकर आहे तरी कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

who is drdo scientist pradeep kurulkar caught in the honey trap of a pakistani woman
who is drdo scientist pradeep kurulkar caught in the honey trap of a pakistani woman
social share
google news

Pradeep Kurulkar: पुणे: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) चा शास्त्रज्ञ प्रदीप कुरूळकर याला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली काहीच दिवसांपूर्वी पुण्यातून अटक केली आहे. एटीएसच्या म्हणण्यानुसार, पुण्यातील डीआरडीओ संचालक (अभियंता) शास्त्रज्ञ प्रदीप कुरूळकर (वय 60 वर्ष) याला हनी ट्रॅप प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे. (who is drdo scientist pradeep kurulkar caught in the honey trap of a pakistani woman)

पुण्यातील डीआरडीओचा शास्त्रज्ञ प्रदीप कुरुळकर हा त्याच्या व्हॉट्सअॅप मेसेज, व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलद्वारे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला माहिती देत ​​असल्याचं ATS ने म्हटले आहे. प्रदीप कुरूळकर हा पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या (पीआयओ) अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे आढळून आले आहे.

एका जबाबदार पदावर असूनही, DRDO शास्त्रज्ञ प्रदीप कुरूळकर याने संवेदनशील सरकारी गुपितांशी तडजोड करून आपल्या पदाचा गैरवापर केला, जे शत्रू देशाच्या हाती पडल्यास भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. अशी माहिती ATS च्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्र एटीएसने मुंबईत अधिकृत गुप्तता कायदा 1923 आणि इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हाही नोंदवला आहे. डीआरडीओने केलेल्या तक्रारीनंतर तपास सुरू करण्यात आल्याचा एटीएसचा दावा आहे. प्रदीप कुरूळकर याला बुधवारी अटक करण्यात आली होती.

हे ही वाचा >> शेजाऱ्याकडून बायको राहिली गर्भवती; पतीने केलेलं कृत्य ऐकून पोलिसही झाले सुन्न

दरम्यान या प्रकरणी दहशतवाद विरोधी पथक महाराष्ट्र राज्य पोलीस ठाणे, काळाचौकी, मुंबई गु.र.न. 02/2023 शासकीय गुपीते अधिनियम1923 कलम 03(1)(क), 05(1)(अ), 05(1)(क), 05(1)(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक, दहशतवाद विरोधी पथकाचे पुणे युनिट करीत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कुरूळकर याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.

ADVERTISEMENT

न्यायालयाने त्याची एटीएस कोठडीत रवानगी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रदीप कुरूळकर याला सोशल मीडिया साइट्सवरील महिलांच्या छायाचित्रांना बळी पडल आणि नंतर गेल्या वर्षी त्याने पाकिस्तानी गुप्तहेरांशी संपर्क साधला.

ADVERTISEMENT

कोण आहे प्रदीप कुरूळकर?

शास्त्रज्ञ प्रदीप कुरूलकर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि संशोधन आणि विकास आस्थापना (अभियंता) R&DE(E) च्या प्रतिष्ठित प्रणाली अभियांत्रिकी प्रयोगशाळेचा संचालक होता. प्रदीप कुरूळकर यांचा जन्म 1963 साली झाला होता.

प्रदीप कुरूळकर याने त्याच्या सुरुवातीच्या शिक्षणानंतर 1985 मध्ये सीओईपी पुणे येथून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग (BE) पदवी मिळवली होती. त्यानंतर प्रदीप कुरूळकर याने 1988 मध्ये CVRDE, आवाडी येथे डीआरडीओसाठी काम करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, प्रदीप कुरूळकर याने आपले संपूर्ण लक्ष ड्राईव्ह आणि अॅप्लिकेशनमध्ये दिले. दरम्यान, त्याने आयआयटी कानपूरमध्ये अॅडव्हान्स पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रम पूर्ण केला. प्रदीप कुरूलकर हा क्षेपणास्त्र प्रक्षेपक, लष्करी अभियांत्रिकी गियर, अत्याधुनिक रोबोटिक्स आणि लष्करी अनुप्रयोगांसाठी मोबाइल मानवरहित प्रणालीच्या डिझाइन आणि विकासामध्ये तज्ज्ञ आहे.

हे ही वाचा >> Tillu tajpuriya : 92 वार, शरीराची चाळणी अन् रक्ताचं थारोळ! पोलिसांसमोरच घेतला जीव

एक टीम लीडर आणि लीड डिझायनर म्हणून, प्रदीप कुरूळकर याने अनेक लष्करी अभियांत्रिकी प्रणाली आणि उपकरणे डिझाइन, विकास आणि वितरणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी हायपरबेरिक चेंबर, मोबाइल वेव्हर सप्लाय, हाय प्रेशर गॅस-मेकॅनिकल सिस्टीम, प्रोग्राम AD, MRSAM, निर्भय सबसॉनिक क्रूझ मिसाइल सिस्टीमसाठी क्षेपणास्त्र लाँचर, QRSAM आणि XRSAM अशा अनेक गोष्टी बनवल्या आहेत.

असं असताना देखील केवळ महिलेच्या आमिषापायी संपूर्ण देशाची सुरक्षाच धोक्यात आणणाऱ्या प्रदीप कुरूळकरला कठोरात कठोर शिक्षा केली जावी अशी मागणी आता अनेक जणांकडून करण्यात येत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT