दुर्दैवी ! खेळण्याच्या नादात उंदीर मारण्याचं औषध खाल्ल्यामुळे 4 वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नागपूर शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. बाहुलीसोबत खेळत असताना चार वर्षांच्या मुलीने चुकून उंदीर मारण्याचं औषध खाल्ल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. गुंजन सिहीरिया असं या मुलीचं नाव असून जय गुरुदेव नगरात ही घटना घडली आहे.

सिहीरिया यांच्या घरात उंदरांचा सुळसुळाट झाला होता. त्यावर उपाय म्हणून गुंजनच्या आईने घरात जागोजागी उंदीर मारायचं औषध लावून ठेवलं होतं. घरात आपल्या बाहुलीसोबत खेळत असताना गुंजनची नजर त्या औषधावर पडली. हे औषध एखाद्या वडीच्या स्वरुपातलं असल्यामुळे गुंजनला ते चॉकलेट असल्याचं वाटलं, त्यामुळे तीने ते औषध खाल्लं.

धक्कादायक! शिलनाथ यात्रेत ५० भाविकांवर मधमाशांचा हल्ला, धावपळीत एकाचा दरीत कोसळून मृत्यू

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे औषध खाल्ल्यानंतर गुंजनला अस्वस्थ वाटायला लागलं आणि तिला उलटी झाली. यावेळी गुंजनच्या आईने तिची चौकशी केली असता आपण जमिनीवर ठेवलेलं औषध खाल्ल्याचं गुंजनने सांगितलं. हे ऐकताच गुंजनच्या आई-वडीलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तात्काळ गुंजनला घेऊन रुग्णालयात धाव घेतली. परंतू उपचारादरम्यान गुंजनचा अखेरीस मृत्यू झाला. हसत-खेळत वावरणाऱ्या गुंजनचा अशा पद्धतीने अंत झाल्यामुळे सध्या परिसरात शोककळा पसरली आहे.

हिंगोली : ट्रेडिंग कंपनीच्या कार्यालयात डांबून तरुणीवर अत्याचार, सहा जणांवर गुन्हा दाखल

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT