Student Suicide : CID मध्ये झालेली निवड, पण.. 22 वर्षीय तरुणीने का संपवलं आयुष्य?

मुंबई तक

Student’s Suicide : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि सीआयडीचे पद मिळूनही एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

ADVERTISEMENT

Student Suicide CID exam selection suicide note
Student Suicide CID exam selection suicide note
social share
google news

Student’s Suicide : देशात बेकारीचा आणि महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा गाजत असतानाच राजस्थानातील एका विद्यार्थिनीच्या आत्महत्येमुळे बेरोजगारी आणि बेकारीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राजस्थानमधील  हनुमानगडमधील एक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर पोलीस आता तिच्या आत्महत्येचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत आहेत.

विद्यार्थिनीच्या मृत्यूने हादरले पोलीस

हनुमानगडमधील एका मुलींच्या हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने आता हॉस्टेलला पोलीस छावणीचे रुप प्राप्त झाले आहे.

हे ही वाचा >> Love and Crime: आईनेच पोटच्या लेकीला विकलं, मुलाला…; अन् प्रियकरासोबत झाली फरार!

सीआयडी पदावर रुजू झाली नाही

विद्यार्थिनीने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी मुलींच्या हॉस्टेलची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यावेळी पोलिसांनी एक सुसाई़ड नोट मिळाली असून त्यामध्ये मला माफ करा असं नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर आणखी काही गोष्टीही त्यामध्ये लिहिण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता कसून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.

तब्बेत बिघडूनही हॉस्टेलवर का

मृत प्रियांकाचे वडील शिवकरण मेघवाल यांनी पोलिसांनी सांगितले की, त्यांच्या मुलीची तब्बेत बिघडली होती. मात्र तरीही ती हॉस्टेलवर राहण्यासाठी गेली होती. त्यानंतर पोलिसांनी थेट तिच्या वडिलांनी फोन करुन त्यांच्या मुलीने आत्महत्या केल्याचे सांगितले होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp