Delhi Firing : दिल्लीत न्यायालयाच्या आवारातच महिलेवर झाडल्या गोळ्या

मुंबई तक

दिल्लीतील साकेत कोर्ट परिसरात आज सकाळी गोळीबार करण्यात आल्याच्या घटनेनं मोठी खळबळ उडाली. वकिलाच्या वेशात आलेल्या एका व्यक्ती महिलेवर गोळ्या झाडल्या.

ADVERTISEMENT

A woman suffered injuries after a shooter, disguised as a lawyer, fired shots at the Saket district court on Thursday.
A woman suffered injuries after a shooter, disguised as a lawyer, fired shots at the Saket district court on Thursday.
social share
google news

दिल्लीतील साकेत कोर्ट परिसरात आज सकाळी गोळीबार करण्यात आल्याच्या घटनेनं मोठी खळबळ उडाली. वकिलाच्या वेशात आलेल्या एका व्यक्ती महिलेवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर परिसरात एकच धावपळ सुरू झाली. न्यायालय परिसरात कडक बंदोबस्त असताना ही घटना घडली. मेटल डिटेक्टर असताना बंदूक घेऊन आरोपी आला कसा, असा प्रश्नही या घटनेच्या निमित्ताने उपस्थित झाला आहे. महिला केससंदर्भात कोर्टात आली होती. मुख्य प्रवेश द्वाराच्या जवळच आरोपीने अचानक गोळ्या झाडल्या.

वकिलाच्या वेशात आला अन् झाडल्या चार गोळ्या

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी वकिलाचा वेशात कोर्ट परिसरात आला होता. आरोपीने महिलेवर चार गोळ्या झाडल्या, ज्या महिलेच्या पोटात आणि इतर भागावर लागल्या. गोळीबारानंतर पोलीस अधिकारी महिलेला एम्स रुग्णालयात घेऊन गेले. महिलेची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान आरोपीची ओळख पटली असून, तो हिस्ट्रीशीटर असल्याचं सांगण्यात आलं आहे. महिला आणि आरोपीमध्ये पैशांवरून जुना वाद आहे आणि त्यातूनच ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.

आम्ही आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला पण…

साकेत कोर्टात जेव्हा ही घटना घडली त्यावेळी तिथे अनेक लोक होते. त्यापैकी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, आम्ही आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, त्याने बंदूक काढली दहशतीचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर त्याने महिलेवर अंदाधुंद गोळीबार केला. आरोपी महिलेच्या ओळखीचा होता.

हेही वाचा >> नाना पटोलेंचं प्रदेशाध्यक्षपद जाणार? पाच नावं चर्चेत, महिला नेत्याचं नाव आघाडीवर

दरम्यान, या घटनेनंतर आम आदमी पक्षाने दिल्लीचे उपराज्यपालांना लक्ष्य केलं आहे. दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलताना आप ने काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp