प्रेम, बलात्कार अन्…; बॉयफ्रेंडसाठी स्वित्झर्लंडहून आली भारतात, नंतर…
Delhi crime News, boyfriend killed foreigner girlfriend : स्वित्झर्लंडहून भारतात आलेल्या ३० वर्षीय महिलेची तिच्या प्रियकराने हत्या केल्याची घटना दिल्लीत घडली.
ADVERTISEMENT

Delhi Murder : तारीख 20 ऑक्टोबर 2023. ठिकाण राजधानी दिल्लीतील टिळक नगर परिसर. एका शाळेजवळ एका परदेशी महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत काही लोकांना दिसला. त्यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. महिलेचे वय 30 असल्याचे समोर आले आहे. ती स्वित्झर्लंडची रहिवासी होती.
तीन दिवसांपूर्वी तिची हत्या झाली होती. या परदेशी महिलेची हत्या कुणी केला, याचा तपास पोलिसांनी सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करण्यात आले. शाळेसमोरच एका घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात राखाडी रंगाची सँट्रो कार दिसली. या गाडीतून एका तरुणाने मृतदेह शाळेजवळ फेकून दिला होता.
पोलिसांनी कसा पकडला आरोपी?
कारचा नंबर ट्रेस करून ही कार एका परदेशी महिलेच्या नावाने विकत घेतल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी महिलेचे कॉल डिटेल्स काढले असता त्यात गुरप्रीतचे नाव समोर आले. तो महिलेचा मित्र होता. मृतदेहाची विल्हेवाट लावताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे पोलिसांनी तातडीने गुरप्रीतला अटक केली.
हे ही वाचा >> Gadchiroli: सून आणि मामीने 5 जणांना कसा भरवला विषाचा घास?, मृत्यूच्या तांडवाची Inside Story
परदेशी महिलेशी कसा भेटला गुरप्रीत?
गुरप्रीत सिंगने पोलिसांना सांगितले की, तो स्वित्झर्लंडमध्ये परदेशी महिलेला भेटला होता. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर गुरप्रीत सिंग अनेकदा स्वित्झर्लंडला जाऊन या महिलेला भेटायचा. गुरप्रीतला संशय होता की, महिलेचे दुसऱ्या पुरुषाशीही संबंध आहेत. त्यानंतर आरोपीने अतिशय हुशारीने महिलेला आधी भारतात बोलावले. त्यानंतर कोणत्या तरी बहाण्याने तो महिलेला एका खोलीत घेऊन गेला. तिला सांगितले की मी तुझे हात पाय बांधून तुला जादू दाखवतो. यानंतर आरोपीने महिलेची हत्या केली.